Ibrahim raisi death : त्या 1.30 मिनिटात दडलय, रईसी यांच्या मृत्यूच रहस्य, संशय खरा ठरणार का?
Ibrahim raisi death : इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर होती. दोन हेलिकॉप्टर सुरक्षित पोहोचली. पण रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. अन्य दोन हेलिकॉप्टर्सच्या अधिकाऱ्यांनी रिपोर्ट् दिला आहे. रईसी यांच्याविरोधात कारस्थान झाल्याचा दाट संशय आहे.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल नवीन खुलासा झाला आहे. ताफ्यातील अन्य दोन हेलिकॉप्टर्सच्या अधिकाऱ्यांनी रिपोर्ट् दिला आहे. रिपोर्टनुसार, खराब हवामानाची माहिती नव्हती. हवामान स्वच्छ होतं. दुर्घटनेच्या ठिकाणी दाट धुक सुद्धा नव्हतं. उड्डाणानंतर 45 मिनिटांनी रईसी यांच्या हेलिकॉप्टरला इशारा मिळाला. हेलिकॉप्टरला ढगाच्या वरुन जाण्याचे निर्देश होते. गायब होण्याच्या 1.30 सेकंद आधी रईसी यांच्या हेलिकॉप्टरकडून अलर्ट मिळाला होता, असं रिपोर्टमध्ये म्हटलय.
गायब झाल्यानंतर रईसी यांच्या हेलिकॉप्टरमधील फक्त एका माणसाशी संर्पक झाला होता. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अयातुल्लाने तब्येत चांगली नसल्याच सांगितलेलं. इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर र्दुघटनेचा प्राथमिक रिपोर्ट समोर आलाय. संशय आता हळूहळू पक्का होत चालला आहे. या संपूर्ण प्रकरणात फक्त दीड मिनिटाचा हिशोब लागत नाहीय. यात दीड मिनिटात रईसी यांच्या मृत्यूच रहस्य आहे.
जे काही घडलय ते सर्व दीड मिनिटात
19 मे रोजी दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने टेकऑफ केलं. 45 मिनिटानंतर रईसी यांच्या पायलेटने इशारा दिला. अन्य दोन हेलिकॉप्टर्सना ढगांच्या वरुन जाण्याचे निर्देश होते. दुर्घटनेच्या दीड मिनिट आधी शेवटचा अलर्ट होता. म्हणजे रईसी यांची हत्या झालीय का?. जो खुलासा झालाय तो काहीतरी गडबड असल्याकडे इशारा करत आहे. हवामान स्वच्छ होतं. धुक्याचा प्रश्नच नव्हता. मग समस्या कुठे आली? जे काही घडलय ते सर्व दीड मिनिटात झालय.