Iran Revolution 2026 : इराणमध्ये खामेनेई सत्तेतून बेदखल झाल्यास पाकिस्तानही वाईट परिणाम भोगेल, पहिले 3 फटके काय असतील?

Iran Revolution 2026 : इराणमध्ये सुरु असलेलं विरोध प्रदर्शन आणि अमेरिकेने दिलेला इशारा यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. इराणमध्ये सरकार कोसळल्यास पाकिस्तानवर सुद्धा संकट ओढवेल. पाकिस्तानला पहिले तीन फटके काय बसतील? ते समजून घेऊया.

Iran Revolution 2026 : इराणमध्ये खामेनेई सत्तेतून बेदखल झाल्यास पाकिस्तानही वाईट परिणाम भोगेल, पहिले 3 फटके काय असतील?
US-Iran_Pakistan Leaders
| Updated on: Jan 12, 2026 | 3:49 PM

इराणमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे. देशात विरोध प्रदर्शन वाढत आहे. लोक रस्त्यावर उतरलेत. इराणी शासनाविरोधात आवाज बलुंद करत आहेत. इराणमधील या ढासळत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हस्तक्षेप करण्याचा इशारा देत आहेत. पण देशातील या अस्थिरतेमुळे इराणमध्ये सरकार कोसळलं, तर त्याचे वाईट परिणाम पाकिस्तानला सुद्धा भोगावे लागतील. सरकार कोसळण्याचा पाकिस्तानवर सुद्धा परिणाम होईल. अमेरिकेने नुकतच आपण काय करु शकतो ते वेनेजुएलामध्ये दाखवून दिलं. आधी सतत इशारा दिले, नंतर अचानक कारवाई केली. अपदस्थ राष्ट्रपती मादुरो यांना थेट त्यांच्या घरातून उचललं. त्यानंतर असं म्हटलं जातय की, ट्रम्प आता इराण विरोधात सुद्धा पाऊल उचलू शकतात. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. जर, तुम्ही आंदोलकांना दाबलत तर अमेरिका त्यांच्या मदतीसाठी पुढे येईल. कशाप्रकारची कारवाई करणार ते त्यांनी स्पष्ट केलं नाही.

ट्रम्प यांचे निकटवर्तीय नेते लिंडसे ग्राहम एका मुलाखतीत म्हणाले की, ‘मी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या जागी असतो, तर इराणी लीडरची हत्या केली असती’ इराणला आधी अमेरिकेकडून इशारा दिला जात आहे. पाकिस्तानची चिंता सुद्धा वाढली आहे. इराणमध्ये सरकार कोसळल्यास पाकिस्तानचं काय नुकसान होईल ते समजून घेऊया.

पहिला धोका

इराण आणि पाकिस्तानमध्ये 900 किलोमीटरची लांब सीमा आहे. त्यावरुन पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. इराणमध्ये सरकार कोसळलं, तर कोणाच्या हातात अधिकार नसतील. अशावेळी बलूच फुटीरतवादी गट जे पाकिस्तान आणि इराण 900 किलोमीटर सीमेच्या दोन्हीबाजूला सक्रीय आहेत, ते अधिक बलशाली होऊ शकतात. त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण राहणार नाही. इराणच्या आत त्यांना नवीन सुरक्षित ठिकाणं मिळतील. शस्त्र मिळू शकतात. त्यांच्या हालचालींवर कंट्रोल ठेवणं कठीण होईल. सोप्या शब्दात इराणमध्ये अराजकता वाढल्या त्याचा पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर परिणाम होऊ शकतो.

दुसरा धोका

पाकिस्तानची दुसरी मोठी समस्या शरणार्थी आहे. शेजारी देशात सत्ता कोसळल्यास शरणार्थी पाकिस्तानच्या दिशेने येऊ शकतात. इराणमध्ये सध्या स्थिती खूप खराब आहे. महागाई गगनाला भिडलीय. लोक उपासमारीचा सामना करत आहेत. सत्ता कोसळल्यास मोठ्या संख्येने शरणार्थी पाकिस्तान सीमेच्या दिशेने कूच करु शकतात. त्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

तिसरा धोका

पाकिस्तानचे सध्या भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांशी तणावपूर्ण संबंध आहेत. दोन्ही सीमांवर टेन्शन आहे. त्यात इराणमध्ये सत्ता गेल्यास अजून एका सीमेवर टेन्शन वाढेल. त्याशिवाय आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच व्यापारी नुकसान होईल ते वेगळं.