पाकिस्तानी सैन्यानेच आम्हाला… असीम मुनीरचा लष्कर-ए-तैयबानच्या दहशतवाद्याने केला पर्दाफाश, खळबळजनक खुलासा…
भारत आणि पाकिस्तानमध्ये कायमच तणाव बघायला मिळाला. त्यामध्येच लष्कर-ए-तैयबानच्या एका दहशतवाद्याने केलेल्या खुलाशानंतर मोठी खळबळ उडाली. थेट पाकिस्तान सैन्याची पोलखोल करण्यात आली.

पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला समर्थन करत नसल्याचे दाखवताना दिसत आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराचा आणि सरकारचा दहशतवाद्यांना पूर्णपणे पाठिंबा असल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले. भारताने आंतराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा बुरखा फाडला. भारतात अनेक दहशतवादी कारवाई पाकिस्तानने घडवून आणल्या आहेत. हेच नाही तर पहलगाम हल्ला पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केला. थेट संबंध दिसून आले. भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान लष्कर दहशतवाद्यांना मदत करतो. पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेमधील संबंधांच्या जुन्या आरोपांना आता नवा पुरावा मिळाला आहे. ज्यामध्ये मोठा दावा करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार सैफुल्लाह कसूरीने पाकिस्तानी सैन्याशी आपले जवळचे संबंध असल्याचे जाहीरपणे म्हटले.
नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कसूरी याने भर मंचावर म्हटले की, पाकिस्तानी सैन्य नियमितपणे आपल्याला त्यांच्या कार्यक्रमांना बोलवत असते. हेच नाही तर सैनिकांच्या अंतिम संस्कारालाही बोलावले जाते. कसूरी हा पाकिस्तानातील एका शाळेतील कार्यक्रमात हे सर्व बोलताना दिसला. यावेळी तो शाळेतील मुलांना संबोधित करत होता. पाकिस्तानी सैन्य आपल्याला कायमच आमंत्रित करत असल्याचे कसूरी याने सांगितल्याने पाकिस्तानचा खोटेपणा जगापुढे आला.
यादरम्यान सैफुल्लाह कसूरी याने भारताबद्दल भडकाऊ भाषण केले. कसूरीने याने म्हटले की, सध्या भारत घाबरलेला आहे. कसूरीने यादरम्यान मान्य केले की, भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी ठिकाणांचे नुकसान झाले. पण ही भारताने अत्यंत मोठी चूक केली. लश्कर ए तैयबा काश्मीरच्या मुद्दयावर मागे हटणार नसल्याचेही त्याने म्हटले.
हेच नाही तर कसूरी याने पहलगाम हल्ला आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही म्हटले होते, त्यानंतर तो जगभरात प्रसिद्धीला आला होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगामध्ये मोठा हल्ला केला होता, या हल्ल्यात तब्बस 26 हिंदू लोकांची हत्या करण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव त्यावेळी बघायला मिळाला. भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले.
