AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलशी वाढत्या तणावात इराणने WhatsApp ला केले टार्गेट, नागरिकांना डिलीट करण्याचे दिले आदेश; काय आहे प्रकरण

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, इराणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना व्हॉट्सएप डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इस्रायलशी वाढत्या तणावात इराणने WhatsApp ला केले टार्गेट, नागरिकांना डिलीट करण्याचे दिले आदेश; काय आहे प्रकरण
| Updated on: Jun 18, 2025 | 8:16 PM
Share

Israel-Iran War : इराण आणि इस्रायलशी युद्धाची सुरुवात झाली असताना आता या वाढत्या तणातणीत इराणी अधिकाऱ्यांनी नागरिकांना WhatsApp सारखे मॅसेजिंग एप्स डिलीट करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांना असा संशय आहे की WhatsApp प्लॅटफॉर्मद्वारे इस्रायली गुप्तचर संस्था डाटा एकत्र करीत आहेत. या पावलाने इराणच्या मनात इस्रायलविषयीची भिती तर व्यक्त झाली आहेच. शिवाय नागरिकांवर डिजिटल निगराणी तसेच सेन्सरशीप वाढवली जात आहे.

इराणचा आरोप काय ?

इराणी अधिकाऱ्यांचा दावा आहे की WhatsApp युजर्सची संवेदनशील माहीती, एवढंच काय मेटाडेटा देखील, विदेशी एजन्सींकडून लिक होऊ शकतो. परंतू WhatsApp ने हे आरोप फेटाळले आहेत. ही बातमी खोटी असल्याचे सांगत इराणला त्यांच्या नागरिकांसाठी इंटरनेट प्रतिबंधांना योग्य ठरविण्यासाठी असे करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. कंपनीने सांगितले की आमची एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन सिस्टम युजरची प्रायव्हसी सुरक्षित ठेवते. आणि सरकारना डाटा पुरवला जात नाही वा मॅसेज कंटेन्टला ट्रॅक केले जाऊ शकते !

तज्ज्ञांचे काय म्हणणे ?

कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे सायबर सुरक्षा तज्ज्ञ ग्रेगरी फाल्को यांच्या मते भले WhatsApp मॅसेज कंटेंटला एन्क्रिप्ट करत असेल परंतू मेटाडेटा ( उदा. संदेश पाठवण्याची वेळ आणि आवृत्ती) लॉग केला जाऊ शकतो. ते पुढे म्हणाले की WhatsApp चा डेटा इराणच्या सर्व्हरवर स्टोअर होत नाही.त्यामुळे डेटा सुरक्षेसंदर्भात चिंता निर्माण होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

आधीही बंदी लादली होती

इराणने WhatsApp वर पहिल्यांदाच बंदी घातलेली नाही.या आधी साल 2022 मध्ये महसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनाच्या वेळी इराणच्या सरकारने WhatsApp आणि Google Play ला ब्लॉक केले होते. मात्र , साल 2024 मध्ये इंटरनेट बंदीवर काही शिथीलता आणण्यात आली. परंतू आतापर्यंत इस्रायलशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर WhatsAppला पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आले आहे.

इराणने अमेरिकेला दिला इशारा

तणावाच्या आणि युद्धाच्या स्थिती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला विनाशर्त माघार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यास प्रत्युत्तर म्हणून इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनेई यांचा वक्तव्यसमोर आले आहे. त्यांनी जर अमेरिकेने जर हस्तक्षेप केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, ज्याची भरपाई कधी होणार नाही. तसेच इस्रायलला इशारा देत त्यांनी हवाई हद्दीत घुसखोरी करुन मोठी चूक केली आहे. ही इराणची ‘रेड लाईन’आहे. जो याला पार करेल तर त्याला माफ केले जाणार नाही. इस्रायलला याची मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांनी म्हटले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.