इराण अमेरिका युद्ध थांबणार, करार घडवून आणण्यासाठी मध्यपूर्वेतील सर्वात मोठे शांतता दूत दाखल, आता…

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका अनेक देशांना बसला. अनेकांनी हे युद्ध थांबवण्याकरिता मोठी भूमिका घेतली. आता इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे मोठे संकेत आहेत. कारण या युद्धाच्या करारात सर्वात मोठा शांतता दूत असलेला देश उतरला आहे.

इराण अमेरिका युद्ध थांबणार, करार घडवून आणण्यासाठी मध्यपूर्वेतील सर्वात मोठे शांतता दूत दाखल, आता...
Egyptian President Abdel Fattah al-Sisi
| Updated on: Mar 24, 2026 | 1:46 PM

इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता इजिप्तने महत्वाची भूमिका घेतलीये. इराण आणि अमेरिका युद्दामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव बघायला मिळाला. यादरम्यान आता इजिप्तकडून महत्वाची भूमिका युद्ध थांबवण्याकरिता घेतली जात आहे. हेच नाही तर इजिप्तकडून आखाती देशांसोबतही चर्चा करण्यात आली. त्यांच्यासोबत संपर्क साधला जात आहे. या संदर्भात इजिप्तने कतार आणि तुर्कस्तानच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धा मध्यस्थी तुर्कस्तान करत आहे पण यात सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्वाची भूमिका इजिप्तची आहे. युरोन्यूजच्या वृत्तानुसार, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी शांतता करार घडवून आणण्याकरिता पुढाकार घेत आहेत. करारात ठेवण्यात आलेल्या अटींवर सातत्याने चर्चा घडवून आणली जात आहे. या शांतता करारात इजिप्तची काैतुकास्पद आणि जगाला शांती देणारी भूमिका दिसत आहे.

मुळात म्हणजे अल-सिसींच्या या प्रयत्नांचा उद्देश मध्य-पूर्वेतील युद्ध टाळणे हा आहे. कारण हे स्पष्ट आहे की, हा संघर्ष अधिक वाढला तर तेल आणि ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला होऊ शकतो आणि त्याचा फटका मध्य सर्वांनाच बसणार. मध्य पूर्वेतील अनेक देश युद्धात ढकलली गेली आहेत.

इजिप्तची भूमिका कधी महत्वाची जाणून घ्या- 

मुद्दा नंबर 1 – मुळात म्हणजे इजिप्त हा एक मुस्लिम बहुल देश आहे. विशेष म्हणजे इजिप्तचे रशिया, अमेरिका आणि सर्वच मुस्लिम देशांसोबत संबंध चांगले आहेत. होर्मुज सामुद्रधुनी इराणकडून रोखला गेला तर त्याचा वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. सर्वांसोबतच चांगले संबंध असल्याने इजिप्त महत्वाची चर्चा घडवून आणत ाहे.

मुद्दा नंबर 2- सर्वात महत्वाची आणि खास बाब म्हणजे आतापर्यंत इजिप्तने जगातील सर्वात मोठी 7 युद्ध रोखली आहेत. यामध्ये इस्रायल-जॉर्डन, इस्रायल-गाझा, सुदान आणि गाझा यासारख्या युद्धांचा समावेश आहे. इजिप्तचे इस्लामी मूलतत्त्ववादी नेत्यांशी उत्तम संबंध आहेत.

मुद्दा नंबर 3- आतापर्यंतचा आलेख बघितला तर इराण आणि अमेरिका युद्धात ओमान आणि तुर्कस्तानने देखील मध्यस्थीची भूमिका निभावली आहे. पण यातील सर्वात आडलेला घोडा म्हणजे या दोन्ही देशांवर इराणला मुळीच विश्वास नाही. इराणचा आग्रहच आहे की, अमेरिकेने आम्हाला युद्ध थांबवल्याची हमी द्यावी. आता या वादात इजिप्त उतरला असून इराण आणि अमेरिकेलाही इजिप्तवर विश्वास आहे.

अमेरिका युद्ध थांबवण्यास तयार आहे, पण इराण नाही. इराण चर्चेसाठीही पुढे येत नाही. इराणने कराराकरिता आपल्या 6 अटी पुढे ठेवल्या आहेत. त्यापूर्ण होत नाहीत तोवर युद्धबंदी नाहीच, अशी भूमिका आजच्या घडीला इराणची आहे. यातील प्रमुख अट अशी आहे की, अमेरिका तेहरानवर पुन्हा कधीच हल्ला करणार नाही, याची हमी हवी आहे. हेच नाही तर 24 दिवसांमध्ये इराणचे जेवढे नुकसान झाले, त्याची भरपाई हवी असल्याचेही इराणने म्हटले आहे. हेच नाही तर यातील एक अट अशीही आहे की, आपल्याला ज्या पत्रकारांनी विरोध केला, त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us