स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद झाल्याने या देशांना मोठा फायदा, मंदीत संधी मिळवत हात धुवून घेतले..

इराणच्या युद्धामुळे होर्मुझ स्ट्रेट बंद झाल्याने भारतासारख्या अनेक देशांमध्ये इंधन आणि गॅसचे संकट निर्माण झाले असेल तरी अनेक देश असे आहेत, ज्यांना मोठा फायदा झाला आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद झाल्याने या देशांना मोठा फायदा, मंदीत संधी मिळवत हात धुवून घेतले..
strait of hormuz
| Updated on: Jun 13, 2026 | 4:04 PM

इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धाने जगात मोठे इंधन संकट तयार झाले. इराणने फेब्रुवारी २०२६ पासून स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केले आहे. सर्वसाधारण काळात जगाचे सुमारे २० टक्के इंधन ( तेल आणि गॅस ) या समुद्री मार्गाने नेले जाते. ज्यात रोजच्या २ कोटी बॅरल कच्च्या तेलाचा समावेश आहे. या इंधन वाहतूक बंदीने अनेक देशांना संकटात टाकले आहे. मात्र, काही देशांनी मंदीत संधी साधली आहे. चला पाहूयात कोणत्या देशांना यापासून फायदा झाला.

रशियाला सर्वात मोठा फायदा

रशियाच्या तेल आणि गॅस टॅक्स महसुलात मे महिन्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ३२.४ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ ६७८.९ अब्ज रुबल ( ९.३ अब्ज डॉलर ) झाली आहे. ही वाढ युद्धाने भडकलेल्या तेल किंमतीच्या रॅलीमुळे झाली आहे. होर्मुझ बंद होणे रशियाच्या तेलासाठी वरदान सिद्ध झाले.ज्यामुळे अमेरिका आणि पाश्चात्य देशांना रशियाच्या समुद्रातील तेलावर आधीच लागलेल्या निर्बंधांना मोकळीक देण्यास मजबूर व्हावे लागले. ज्यामुळे रशियाने चांगला नफा कमावला. अमेरिकेने भारतासह अनेक देशांना रशियांकडून तेल खरेदी करण्यास सूट देखील दिली होती.

अमेरिकेला मिळाली मोठी संधी

रशियन तेल कंपनी रोसनेफ्ट ( Rosneft )च्या मते होर्मुझ स्ट्रेट बंद झाल्याने जागतिक बाजारात तेलाची टंचाई निर्माण झाली. ज्याचा सर्वात जास्त फायदा अमेरिकन ऊर्जा कंपन्यांना मिळाला. अमेरिकेच्या एनर्जी इनफॉर्मेशनल एडमिनिस्ट्रेशनने ( EIA ) २०२६ साठी ब्रेंट क्रुडच्या किंमतीचा अंदाज ५८ डॉलरने वाढून ७९ डॉलर प्रति बॅरल केला. तसेच अमेरिकेच्या कच्च्या तेलाचे उत्पादन २०२६ मध्ये १.३६ कोटी बॅरल प्रतिदिन पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.

सौदी अरबचा फायदा

होर्मुझ बंद झाल्याने इतर आखाती देशांचे नुकसान झाले, परंतू सौदी अरबने त्याच्या ईस्ट-वेस्ट पाईपलाईनचा वापर करुन कच्च्या तेलाची निर्यातीला होर्मुझच्या ऐवजी लाल समुद्राच्या मार्गाने सहजपणे डायव्हर्ट केले. यान्बू पोर्टच्याद्वारे सौदी अरबने एक्सपोर्ट वाढवला. यामुळे सौदी अरबचा ऑईल एक्सपोर्ट आणि रेव्हेन्यू गेल्या अनेक वर्षात रेकॉर्ड स्तरावर पोहचला आहे. सरकारी कंपनी सौदी अरामको हीने पहिल्या तिमाहीत ३३.६ अब्ज डॉलरचा नेट प्रॉफीट नोंदवला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत २६ टक्के जास्त आहे.

इराकती पाईपलाईन पुन्हा सक्रीय

इराणहून तुर्कीला जाणारी सुमारे ६०० मैल लांबीची पाईपवाईन होर्मुझ संकटामुळे पुन्हा उघडण्यात आली. या पाईपलाईनची एकूण क्षमता सुमारे १६ लाख बॅरल प्रतिदिन आहे. ज्याला सुरुवातीला २.५ लाख बॅरल प्रति दिनच्या क्षमतेने उघडण्यात आले. याशिवाय इराक ओमान, जॉर्डन आणि इजिप्तच्या दिशेने देखील नवीन पाईपलाईन टाकण्याचा विचार करत आहे.

ओमान आणि नार्वेला फायदा

ओमान स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या बाहेर आहे. यामुळे ओमानची निर्यात जास्त प्रभावित झाली नाही. उलट जागतिक इंधनाच्या किंमती वाढल्याने ओमानचा फायदा झाला. नॉर्वे यूरोपातील सर्वात मोठे तेल आणि गॅसचा निर्यातदारांपैकी एक आहे. होमुर्झ संकटाने नॉर्वेच्या कमाईत मोठी वाढ झाली. तेलाच्या जास्त किंमतीने सर्वाधिक फायदा मिळणाऱ्या देशात नॉर्वेचा देखील समावेश आहे.

Follow Us