आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, एलपीजी गॅसचा तुटवडा संपण्याचे संकेत, थेट इराण…

इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतात मोठा फटका बसला आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. फक्त भारतच नाही तर जगातील अनेक देश संकटात आहेत. त्यामध्येच आता एलपीजी गॅसच्या तुटवड्यादरम्यान मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, एलपीजी गॅसचा तुटवडा संपण्याचे संकेत, थेट इराण...
LPG gas
| Updated on: Mar 11, 2026 | 9:56 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. मात्र युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. तणाव अधिक वाढताना दिसत आहे. इराणकडून होर्मुज समुद्री महामार्ग बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली. भारतात होर्मुज समुद्री महामार्गाच्या माध्यमातूनच गॅस आयात होतो. मात्र, हा महामार्ग बंद करण्यात आल्याने भारत संकटात सापडला. भारतात मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव अस्थिर झाले. भारत या सर्व परिस्थितीमधून मार्ग काढताना दिसत आहे. इराण आणि अमेरिकेत भयानक युद्ध सुरू असतानाच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. परराष्ट्र मंत्रायलयाने यावर बोलताना स्पष्ट केले की, दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर आणि जहाजांच्या सुरक्षेबद्दल चर्चा झाली.

इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी होर्मुज आणि फारस खाडी येथील समुद्री सुरक्षेवर काही मुद्दे उपस्थित केले. सध्या या मार्गावर असुरक्षितता आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा थेट परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणचे विदेश मंत्री अराघची यांच्यासोबत सध्याच्या संघर्षाच्या स्थितीवर चर्चा झाली.

आम्ही संपर्कात राहणार आहोत. मोजतबा खामेनेई यांना इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून जाहीर करण्याअगोदर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली होती. सध्याची परिस्थिती बघता होर्मुज महामार्ग भारताच्या टॅंकरसाठी इराण मोकळा करू शकतो.पुढील काही दिवस हा मार्ग बंद राहिला तर भारतात मोठे संकट येऊ शकते.

भारतात सध्याच गॅसचा मोठा तुडवटा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद करण्यात आली. त्यामध्येच जर अजून काही दिवस हा मार्ग बंद राहिला तर घरगुती सिलेंडर पुरवठा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. भारतासह अनेक देशांमध्ये गॅस आणि कच्च्या तेलाचे संकट आहे. रशिया भारताला कच्चे तेल पुरवठा करत असल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलची कमी नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us