इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत..

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढला आहे. त्यामध्येच अमेरिकेने असा गेम खेळला की, या युद्धाची पूर्ण दिशा आणि दशाच बदलल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेने इराणचा मोठा गेम केला. मित्रानेच इराणसोबत घातक काम केले.

इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत..
Donald Trump and Ali al-Zaidi
| Updated on: Jul 16, 2026 | 1:23 PM

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम फक्त दोन देशांपुरताच मर्यादित राहत नाही तर याचा फटका जगातील सर्वच देशांना बसतो.  इराणने नुकतेच आपले सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांना अखेरचा निरोप दिला. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनेई ठार झाले. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील जवळपास सदस्य मारले गेले. या हल्ल्यात अयातुल्ला खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई थोडक्यात बचावला. सध्या इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून त्यांनी आपल्या हातात धुरा घेतली. इराण आणि इराक यांच्यातील मैत्री अत्यंत जुनी आहे. मात्र, आता याच मैत्रीला तडा गेल्याचे बघायला मिळतंय.

इराकी पंतप्रधान अली अल झैदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ही भेट चर्चेचा एक प्रमुख विषय ठरली आहे. कारण इराण आणि अमेरिका यांच्यात ज्या पद्धतीचा संघर्ष सध्याच्या घडीला सुरू आहे, त्यात इराकच्या पंतप्रधानांची भेट घेतल्याने खळबळ उडाली. खामेनेई यांचे पार्थिव इराकमधील पवित्र शहर असलेल्या नजफ येथे आणण्यात आले होते.

ज्यावेली नजफ आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित एका समारंभात इराकी सरकारी अधिकारी आणि पंतप्रधान अल झैदी देखील उपस्थित होते. मात्र, यादरम्यानच अल झैदी यांची ट्रम्प यांच्याशी झालेली अलीकडील भेट अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरली आहे. या भेटीमुळे आता इराण आणि इराक यांच्यात तणाव वाढू शकतो. इराणला अजिबात हे सहन झाले नसल्याचे दिसंतय.

इराक इराणचा मित्र आहे की, शत्रू हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अल झैदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे कौतुक केले. या भेटीचा फोटोही पुढे आला. शत्रू करणार नाही असे काम इराकने केल्याचे बोलले जातंय. इराकची दिशा बदलली, असे ट्रम्प यांनी नमूद केले. इराकमधील सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत आपणही महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला. ज्यामुळे आखाती देशात खळबळ उडाली.

Follow Us