एलियन्सच्या अस्तित्वाबाबत सर्वात मोठा दावा, बराक ओबामांचे खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले?

Aliens : एलियन्सच्या अस्तित्वाबाबत वेगवेगळे दावे केले जात असतात. अशातच आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही यावर भाष्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

एलियन्सच्या अस्तित्वाबाबत सर्वात मोठा दावा, बराक ओबामांचे खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले?
aliens and obama
Image Credit source: Google
| Updated on: Feb 15, 2026 | 3:31 PM

जगातील अनेक लोकांना आतापर्यंत एलियन्सच्या अस्तित्वाबाबत वेगवेगळे दावे केले आहेत. अनेकांनी तर एलियन्स दिसल्याचाही दावा केला आहे. याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अशातच आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका पॉडकास्टमध्ये एलियन्सबाबत भाष्य केले आहे. एलियन्स आहेत का? या प्रश्नावर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ओबामा यांनी नेमकं काय म्हटले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ब्रायन टायलर कोहेन याच्या पॉडकास्टमध्ये ब्रायन यांनी ओबामा यांना एलियन्स आहेत का असा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना ओबामा म्हणाले की, ‘हो एलियन्स आहेत, पण मी त्यांना पाहिलेले नाही. ते एरिया 51 मध्ये लपलेले नाहीत.’ ओबामा यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लोकांनी असं म्हटले आहे की ओबामा यांनी एलियन्सच्या अस्तित्वाची पुष्टी केली. त्यानंतर आता जिमी किमेल शोची एक जुनी क्लिप देखील व्हायरल होत आहे, ज्यात ओबामा यांनी एलियन्स आपल्यावर नियंत्रण ठेवतात असे विधान केले होते.

ओबामा नेमकं काय म्हणाले?

बराक ओबामा यांचे पॉडकास्ट 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झाले. या पॉडकास्टमध्ये ब्रायन टायलर कोहेन यांनी ओबामांना थेट विचारले की एलियन्स खरे आहेत का? ओबामा यांनी उत्तर दिले की, “ते खरे आहेत, पण मी त्यांना पाहिलेले नाही आणि ते एरिया 51 मध्ये किंवा इतर कुठेही लपलेले नाहीत. कोणतीही मोठी लपवाछपवी नाही.” पुढे बोलताना ओबामा यांनी स्पष्टपणे सांगितले की माझ्या अध्यक्षपदाच्या काळात मला गुप्त एलियन बेस किंवा क्रॅश झालेल्या यूएफओबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती. त्यांनी असेही म्हटले की, आपल्या ग्रहावर परग्रही लोकांचे अस्तित्व शक्य आहे, मात्र याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

ओबामा यांनी यूएफओ बद्दल काय म्हटले होते?

बराक ओबामा यांनी याआधीही अनेक वेळा यूएफओ/यूएपी बद्दल भाष्य केलेले आहे. 2021 मध्ये, त्यांनी म्हटले होते की ‘काही व्हिडिओ आणि रेकॉर्ड्समध्ये अशा गोष्टी दाखवल्या जातात ज्या आपल्याला समजत नाहीत. त्या वस्तू कशा उडतात? त्यांचा वेग आकलना पलीकडील आहे. पण त्यांनी कधीही एलियन्सच्या अस्तित्वाची पुष्टी केली नव्हती. त्यांनी म्हटले की हे ड्रोन, हवामानातील घटना किंवा तांत्रिक बिघाड असू शकतात. मात्र आता त्यांनी अलिएन्स असल्याबाबत रोखठोक विधान केले आहे. त्यामुळे याची संपूर्ण जगात चर्चा रंगली आहे.