Israel-Hezbollah War: इस्रायलचा हिजबुल्लावर एअर स्ट्राईक, हवाई हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू

Israeli strike on Beirut: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु असताना त्यानंतर आता इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात देखील संघर्ष सुरु झालाय. इस्रायलकडून हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे कमांडर आणि सैनिक मारले गेले. हिजबुल्लाहच्या लोकांची बैठक सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला.

Israel-Hezbollah War: इस्रायलचा हिजबुल्लावर एअर स्ट्राईक, हवाई हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू
| Updated on: Sep 21, 2024 | 8:58 PM

इस्रायलने शनिवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केला आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बेरुतमध्ये इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात 3 मुले आणि 7 महिलांसह 31 लोकं ठार झाली आहेत. इस्रायलकडून हिजबुल्लाहच्या ठिकाणांनी लक्ष्य केले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहने शुक्रवारी रात्री सांगितले की, मृतांमध्ये इब्राहिम अकील आणि आणखी एक शीर्ष कमांडर अहमद वहबी यांच्यासह 16 सदस्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आणखी वाढला आहे.

मारल्या गेलेल्या अकीलवर ५८ कोटींचे बक्षीस होते. तो अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड होता. इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, एफ-35 लढाऊ विमानांचा वापर करून इस्रायलने ही कारवाई केली आहे. F-35 मधून क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. अल जझीरा नेटवर्कच्या वृत्तानुसार, इस्रायलकडून चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हिजबुल्लाहच्या फोर्सची बैठक सुरू असताना हा हल्ला झाला. जमिनीच्या खाली भुयारामध्ये ही बैठक सुरू होती. त्याच ठिकाणाला इस्रायलने लक्ष्य केले आहे.

वॉकीटॉकीमधील स्फोटांमुळे 39 जणांचा मृत्यू

हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर आणि वॉकी-टॉकीवर झालेल्या स्फोटांमुळे बुधवारी लेबनॉनमध्ये 39 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 3,000 हून अधिक लोकं जखमी झाले होते. हिजबुल्लाहने यासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. पण इस्रायलने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. हिजबुल्लाहचे वाहतूक मंत्री अली हमीह यांनी शुक्रवारी मीडियाला सांगितले की, किमान 23 लोकं अद्याप बेपत्ता आहेत. इस्रायलचे या भागाला युद्धाकडे घेऊन जात आहेत. आम्ही ढिगाऱ्याखालून महिला आणि मुलांना बाहेर काढत आहोत, असे ही त्यांनी सांगितले.

इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 70 लेबनीज लोकांचा मृत्यू

हिजबुल्लाहने मध्यरात्रीनंतर एक निवेदन जारी करून अकीलच्या मृत्यूची पुष्टी केली. वरिष्ठ कमांडर वहबीसह १५ इतर सदस्य मारले गेल्याचे हिजबुल्लाहने सांगितले आहे. या आठवड्यात लेबनॉनमध्ये किमान 70 लोकं मारले गेली आहेत. ऑक्टोबरपासून देशातील मृतांची संख्या 740 च्या वर गेली आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील सध्याचा संघर्ष 2006 मधील युद्धानंतरचा सर्वात वाईट संघर्ष आहे.