AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: तलवारीने मारण्याची धमकी देणाऱ्या दिव्याची हाकलपट्टी… आता म्हणते, ‘खूप काही सांगायचंय…’

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: 'बिग बॉस मराठी 6' सध्या तुफान चर्चेत आलं आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे. बिग बॉसने दिव्या शिंदे हिची हाकालपट्टी केल्यानंतर दिव्या काय बोलणार याकडे सर्वांचं लागलं आहे. तर दिव्या हिच्या टीमकडून एक पोस्ट देखील करण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: तलवारीने मारण्याची धमकी देणाऱ्या दिव्याची हाकलपट्टी... आता म्हणते, 'खूप काही सांगायचंय...'
Bigg Boss 6
| Updated on: Feb 07, 2026 | 3:14 PM
Share

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: अभिनेता रितेश देशमुख याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी 6’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉसने स्पर्धक दिव्या शिंदे हिला अचानक घरातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना आणि दिव्या हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सांगायचं झालं तर, एका टास्क दरम्यान, दिव्या हिने स्पर्धक तन्वी हिला धमकी दिल्यानंतर घरातील वातावरण बिघडलं…

तन्वी हिने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे दिव्या हिचा पारा चढला… त्यानंतर दिव्या हिने थेट तन्वी हिच्यावर तलवार चालवण्याची धमकी दिली… एवढंच नाही तर, बिग बॉसने दिव्या हिला स्वतःती चूक सुधारण्याची देखील धमकी दिली. पण दिव्या हिने माफी मागितली नाही. अशात, इतर सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दिव्याला दंड म्हणून तातडीने बाहेर काढलं.

बिग ब़ॉसने हाकलल्यानंतर दिव्या हिच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या दिव्या हिच्या टीमकडून शेअर करण्यात आलेली पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खूप काही सांगायचं आहे… असं लिहिलं आहे… सध्या सर्वत्र दिव्या हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

पोस्टमध्ये काय म्हणाली दिव्या शिंदे?

दिव्या हिच्या टीमकडून पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “आम्ही समजू शकतो की, ‘बिग बॉस मराठी’ शोमधून दिव्या शिंदेची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावुक झालेत आणि अनेकांना धक्का देखील बसला आहे. पण तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्वकाही आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण सर्वांना एक विनंती करतो, कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. आम्ही लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरं देत आमची बाजूही मांडू”

काय म्हणाली दिव्या शिंदे…

दिव्या म्हणाली, “मी या घराबाहेर ‘सरकार’ म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे, याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल, हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल.” एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणं हे बिग बॉसच्या नियमावलीच्या पूर्णपणे विरोधात होतं.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.