AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार सलमान आघाचा बाबर आझमला अप्रत्यक्षरित्या टोला, निसटत्या विजयानंतर म्हणाला..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवताना चांगलाच घाम गाळावा लागला. नेदरलँडने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. या विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने खडे बोल सुनावले.

कर्णधार सलमान आघाचा बाबर आझमला अप्रत्यक्षरित्या टोला, निसटत्या विजयानंतर म्हणाला..
कर्णधार सलमान आघाचा बाबर आझमला अप्रत्यक्षरित्या टोला, निसटत्या विजयानंतर म्हणाला..Image Credit source: INSTAGRAM
| Updated on: Feb 07, 2026 | 3:09 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 3 चेंडू आणि 3 विकेट राखून नेदरलँडचा पराभव केला. खरं तर एक क्षण असा आला होता की हा सामना पाकिस्तानच्या हातून जातो की काय? पण फहिमने 19व्या षटकात फटकेबाजी केली आणि सामन्याचं चित्र बदललं. त्याने 19व्या षटकात 24 धावा काढल्या आणि विजय पाकिस्तानच्या पारड्यात पडला. खरं तर हा सामना सुरूवातीपासूनच पाकिस्तानच्या पारड्यात होता. त्यामुळे पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटत होतं. पण 10 व्या षटकानंतर सर्व काही बदललं. 12 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाकिस्तानच्या 98 धावा असताना तिसरी विकेट पडली. या विकेटनंतर सामन्याचं चित्र पालटलं. कारण लगेचच दुसऱ्या चेंडूवर उस्मान खान तंबूत परतला. त्यामुळे 98 धावांवर 4 अशी स्थिती आली. पाकिस्तानचा संघ पाहता हा विजय सहज मिळवेल असं वाटलं होतं. पण बाबर आझमच्याने विजय आणखी कठीण झाला.

बाबर आझम नेदरलँडच्या गोलंदाजांचा सामना करताना धडपडताना दिसला. त्याने 18 चेंडूत खेळले आणि 15 धावा केल्या. 18 चेंडू म्हणजे एकट्याने तीन षटकं खेळली आणि त्यात फक्त एक चौकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट हा 83.88 चा होता. त्याच्या संथगतीने केलेल्या फलंदाजीचा पाकिस्तानला फटका बसला. कारण त्यानंतर धावा आणि चेंडू यांच्यातलं अंतर वाढत गेलं. संघाच्या 100 धावा असताना बाबर आझम बाद झाला. तेव्हा 13वं षटक सुरू होतं. पण पाच विकेट पडल्याने मधल्या फळीवर दबाव वाढला. बाबर आझमच्या या खेळीमुळे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाही वैतागलेला दिसला. त्याने अप्रत्यक्षरित्या बाबर आझमला सुनावलं.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा म्हणाला की, ‘आम्ही पहिल्या 10 षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली, पण पाच, सहा, दोन, तीन वाईट षटके असतील तर तुम्ही खेळापासून खूप दूर जाता. पण फहीमला श्रेय जाते. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, मला वाटते की त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली.’ सलमान इतक्यावर थांबला नाही त्याने दुसऱ्या पहिल्या 10 षटकांचा उल्लेख केला. ‘मला वाटते की पहिले 10 षटकं खूप चांगली होती. आम्ही खरोखर चांगली फलंदाजी केली आणि नंतर ते विकेट खेचण्यात यशस्वी झाले. मग त्या वेळी, दबाव आला. मला वाटतं की अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याची गरज आहे.’

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश