AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Hamas War | फक्त 72 तासात घातक वार, हमासच्या 1500 दहशतवाद्यांचा ‘गेम ओव्हर’

Israel Hamas War | इस्रायली सैन्याकडून आणखी महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. कुठलीही वॉर्निंग न देता नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं, तर बंधकांना ठार मारण्याची धमकी हमासकडून देण्यात आलीय.

Israel Hamas War | फक्त 72 तासात घातक वार, हमासच्या 1500 दहशतवाद्यांचा 'गेम ओव्हर'
Israel Hamas War
| Updated on: Oct 10, 2023 | 1:07 PM
Share

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु झालेल्या भीषण युद्धाचा आज चौथा दिवस आहे. हमासचे दहशतवादी शनिवारी गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. माणुसकीला काळीमा लावणारी कृत्य केली. त्यांनी नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं. मुल, लहान बाळं, महिला आणि वयोवृद्ध नागरिक कोणाला म्हणजे कोणाला सोडलं नाही. मागच्या चार दिवसांपासून दक्षिण इस्रायलमध्ये सैन्य आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरु होती. अखेर आज इस्रायली सैन्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलय. दक्षिण इस्रायल आणि सीमावर्ती भागात नियंत्रण मिळवल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. इस्र्यालच्या हद्दीत हमासच्या 1500 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. इस्रायली सैन्याकडून या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

सोमवारी रात्रीपासून हमासचा एकही दहशतवादी सीमा ओलांडून इस्रायलमध्ये घुसलेला नाही. इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते रिचर्ड हेच यांनी ही माहिती दिली. घुसखोरी पुन्हा होऊ शकते, ही शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. इस्रायली फायटर विमानांकडून गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. सततच्या या बॉम्बवर्षावात हमासचे नेते आणि त्यांच्या तळांना लक्ष्य केलं जात आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अनेक पिढ्यांना लक्षात राहील असा हमासला धडा शिकवण्याचा संकल्प सोडलाय. अनेक वर्षानंतर प्रथमच इस्रायलच्या रस्त्यावर अशी आमने-सामनेची लढाई सुरु आहे. कुठलीही वॉर्निंग न देता नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं, तर बंधकांना ठार मारण्याची धमकी हमासकडून देण्यात आलीय. रणगाडे आणि ड्रोन्सची तैनाती

150 सैनिक आणि नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. हमासचे दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसल्यानंतर ते निरपराध नागरिकांना बंधक बनवून आपल्यासोबत घेऊन गेले. इस्रायलने सैन्याने जमवाजमव सुरु केली आहे. त्यामुळे ते जमिनीवरुन हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. 2014 साली इस्रायलने शेवटचा गाझा पट्टीवर जमिनी हल्ला केला होता. गाझापट्टी जवळच्या शहरात राहणाऱ्या इस्रायली नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फेन्सिंग मोडून घुसखोरी होऊ नये, यासाठी रणगाडे आणि ड्रोन्सची तैनाती करण्यात आली आहे. एअर स्ट्राइकच्या भीतीने गाझामधून हजारो लोकांनी पलायन केल आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.