इस्रायल-हमास युद्धाने भारतासह जगाला धोका, गुप्तचर संघटना हायअलर्टवर, कोणत्या गोष्टीची भीती ?

हमास आणि इस्रायल युद्धाने भारतासह जगभराला धोका आहे. त्यामुळे गुप्तचर संघटना सावध झाल्या आहेत. काय निर्माण झाला धोका पाहा...

इस्रायल-हमास युद्धाने भारतासह जगाला धोका, गुप्तचर संघटना हायअलर्टवर, कोणत्या गोष्टीची भीती ?
jordan
Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 18, 2023 | 10:05 PM

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : हमास आणि इस्रायल  ( Israel-Hamas ) युद्धाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होणार आहे. हे युद्ध दोन देशात सुरु असले तरी त्याने जगभरातील गुप्तचर संघटना हायअलर्टवर गेल्या आहेत. हे प्रकरण दोन देशापुरते राहीलेले नाही. या युद्धाचा जगावर परिणाम होणार आहे. या युद्धाचा गैरफायदा घेऊन काही विपरित घडू नये यासाठी जगभरातील गुप्तचर संघटना हायअलर्ट मोडवर आहेत.

पॅलेस्टिनी मुद्द्याला जगभरात मिळत असलेला समर्थनास नजर अंदाज करता येणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे इस्रायलवर हमासने केलेल्या नृशंस हल्ल्याने काळजी वाढली आहे. हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत. आता हे युद्ध जगाची फाळणी करणारे आहे. आणि अमेरिका आणि आखाती देश तसेच अन्य देशांना हे युद्ध एक आव्हान ठरले आहे. एक समूह एकतर हमासचे समर्थन करीत आहेत किंवा दुसऱ्या बाजूला आपली ताकद वाढविण्यासाठी या युद्धाचा वापर करीत आहेत.

सोशल मिडीयावर खोटे व्हिडीओ

आयबीचे माजी अधिकारी यशोवर्धन आझाद यांनी म्हटलेय की अनेक खोटे व्हिडीओ मुद्दामहून पसरवले जात आहेत. सोशल मिडीयाचा वापर या क्षेत्रातील तणाव वाढविण्यासाठी होत आहे, अतिरेकी आपल्या रणनीतीचा प्रचार करण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत. परंतू यावर गुप्तचर संघटना लक्ष ठेवून आहेत. या खोट्या व्हिडीओंवर गुप्तचर संघटनांनी लक्ष ठेवले आहे. तसेच अल कायदा, आयएस, तसेच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे स्लिपर सेल आपली मजबूत स्थिती तसेच उपस्थिती दाखविण्यासाठी छोटेमोठे हल्ले करु शकतात असे यशोवर्धन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. इस्रायल- हमास युद्धावर नवी दिल्लीतील सुरक्षा अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत.

हे युद्ध जास्त पसरणार नाही ?

हे युद्ध पसरणार नसल्याचा दावा संरक्षण यंत्रणेतील एका गटाचा आहे. कारण सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती सारखे आखाती देश संपत्ती रक्षणाला प्राधान्य देतील. तर कतार ओलिसांच्या अदान प्रदानात मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. हमासला कोणत्याही समझौता वा बैठकीत वैध भागीदार म्हणून स्थान मिळणार नाही. हमासने अनेक नागरिकांची हत्या केली आहे. तसेच अनेकांना ओलीस ठेवले आहे.