AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Iran War : इराणमध्ये पुतण्याच उठला काकाच्या जीवावर, अयातुल्ला खामेनीचा पाय खोलात; पुतण्यानेच पुकारले बंड, ती मोठी अपडेट काय

Ayatollah Khamenei nephew Mahmoud Moradkhani : इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिका केव्हाही मैदानात उतरू शकतो. पण त्यापूर्वीच सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनीच्या घरातच बंडाचा झेंडा फडकला आहे. ही हुकूमशाही उलथवून टाका असे आवाहन त्यांच्या पुतण्याने केले आहे. त्यानेच काकाला आव्हान दिले आहे.

Israel-Iran War : इराणमध्ये पुतण्याच उठला काकाच्या जीवावर, अयातुल्ला खामेनीचा पाय खोलात; पुतण्यानेच पुकारले बंड, ती मोठी अपडेट काय
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 19, 2025 | 10:36 AM
Share

महाराष्ट्रासह भारताला काका-पुतण्याचे बंड नवीन नाही. पण आता हे लोण थेट इराणपर्यत पोहचले आहे. येथे जशी काकाविरोधात पुतण्याने बंडाळी केल्याचे उदाहरणं आहेत. तसाच बंडा झेंडा इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी याच्या पुतण्याने फडकावला आहे. ‘इस्लामिक प्रजासत्ताक जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत या भागात शांतता नांदणार नाही. ही हुकूमशाही नष्ट करा’ असे आवाहन महमूद मोरदखानी यांनी केले आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलने अर्धी लढाई अगोदरच जिंकल्याचे मानण्यात येत आहे. काय आहे इराणमधील अपडेट?

सुधरत नसतील तर नष्ट करा

इस्त्रायलसोबत जो लष्करी संघर्ष सुरू आहे तो दुर्भाग्यपूर्ण आहे. जो ही हे सरकार, (आयातुल्ला अली खामेनी) संपवले, नष्ट करेल, ते गरजेचे आहे. जर आपण येथेपर्यंत आलाच आहात तर ते नष्टच करा. ते जर सुधारत नसतील. ते जर स्वत: बदल घडवून आणत नसतील, अटी मान्य करत नसतील तर ते राज्य नष्ट करा, असे आवाहन मोरदखानी यांनी केले आहे. 1986 पासून मोरदखानी हे इराण बाहेर आहेत. ते सातत्याने त्याच्या काकाच्या निरंकुश हुकूमशाहीविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना या परिसरातील शांततेसाठी हे इस्लामिक गणराज्य नष्ट करण्याची विनंती केली आहे.

हे इस्लामी राज्य नष्ट करा -मोरदखानी

खामेनी यांच्या हत्येनंतर सरकार खरंच लागलीच संपेल का? हा वेगळा प्रश्न आहे. या गोष्टी इथपर्यंत पोहचतील याचं मला तीव्र दु:ख होत आहे, असे मोरदखानी म्हणाले. पण सध्याच्या घडामोडींमुळे इराणमधील मोठा जनसमूदाय आनंदीत आहे. हे सरकार कमकुवत झाल्याने ते खूष आहेत, असा दावा मोरदखानी यांनी केला. हे जितक्या लवकर संपेल, तितके चांगले. इस्लामिक प्रजासत्ताक जितक्या लवकर नष्ट होईल तितके चांगले. माझे असे मत आहे की, ही निरंकुश सत्ता उलथून टाका. असे मोरदखानी म्हमाले.

लगेचच खामेनाला ठार करणार नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला विनाअट शरणागती पत्कारण्याचे आवाहन दिले आहे. त्यांनी सामोपचाराने हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. अयातुल्ला खामेनी कुठे लपले आहेत हे आम्हाला पक्कं ठाऊक आहे, पण आम्ही त्यांना आताच ठार करणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. इराणच्या अणू प्रकल्पांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी खासगी परवानगी दिली आहे. पण अद्याप कोणताही अंतिम आदेश दिलेला नाही.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.