Israel-Hamas War | भयानक, पॅलेस्टिनींच्या जमावावर इस्रायली सैन्याचा अंदाधुंद गोळीबार, नेमक काय घडलं? किती ठार?

| Updated on: Mar 01, 2024 | 9:02 AM

Israel-Hamas War | इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आणखी एक भयानक घटना घडली आहे. इस्रायली सैन्याच्या गोळीबारात अनेक पॅलेस्टिनी नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. इस्रायली सैन्याने अचानक हा गोळीबार का केला? किती जण ठार झाले?

Israel-Hamas War | भयानक, पॅलेस्टिनींच्या जमावावर इस्रायली सैन्याचा अंदाधुंद गोळीबार, नेमक काय घडलं? किती ठार?
Israel-Hamas War
Image Credit source: Representative image
Follow us on

Israel-Hamas War | इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याच्या बॉम्ब वर्षावात अनेक निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अजूनही हे युद्ध थांबलेलं नाहीय. हमासला पूर्णपणे नष्ट करत नाही, तो पर्यंत थांबणार नाही, असा संकल्प इस्रायलने केलाय. त्यामुळे अजूनही हे भीषण युद्ध सुरु आहे. अनेक निरपराध नागरिक यात मारले जात आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक भयानक घटना घडली आहे. इस्रायली सैन्याच्या गोळीबारात 100 पेक्षा जास्त पॅलेस्टिनींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रॉयटर्सने ही माहिती दिलीय.

गाझा शहराजवळ मदतीच्या प्रतिक्षेत थांबलेल्या जमावावर इस्रायली सैन्याने गोळीबार केला. त्यात 104 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. 280 जखमी झाले, अशी माहिती गाझामधील आरोग्य यंत्रणेने दिली. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल इद्रा यांनी सांगितलं की, ‘गाझा शहराच्या पश्चिमेला अल नाबुसी येथे ही घटना घडली’. अल शिफा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जखमींची स्थिती आणि संख्या इतकी मोठी होती की, उपचारांसाठी वैद्यकीय पथक अपुर पडत होतं, असं अश्रफ अल इद्रा यांनी सांगितलं.

का गोळीबार केला?

अल नाबुसी भागात इस्रायली सैन्याचे रणगाडे आधीपासूनच होते. मदत सामानाने भरलेले काही ट्रक या रणगाड्यांच्या जवळ आले. त्यावेळी हजारोंचा जमाव ट्रकच्या दिशेने पळाला. यावेळी रणगाड्याजवळ येणाऱ्या गर्दीवर गोळीबार करण्यात आला. प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने AFP ने हे म्हटलय. या घटनेमुळे बंधकांच्या सुटकेसाठी जी बोलणी सुरु आहेत, ती फिसकटू शकतात असा इशारा हमासने दिलाय. चर्चा अपयशी ठरली, तर त्याला इस्रायल जबाबदार असेल. आमच्या लोकांच रक्त वाहणार असेल, तर आम्हाला ते मान्य नाही असं हमासकडून सांगण्यात आलय. 7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या युद्धात इस्रायलमध्ये 1000 पेक्षा जास्त, तर पॅलेस्टाइनमध्ये 30 हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय.