हमासला मोठा झटका, एअर स्ट्राईकमध्ये नेता मोहम्मद सिनवार ठार, इस्त्रायलचा दावा काय?

Israeli Hamas War : हमासला मोठा झटका बसला आहे. इस्त्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये हमासचा कमांडर मोहम्मद सिनवार मारल्या गेल्या आहे. हा हल्ला एका रुग्णालयाच्या खालील सुरुंगात करण्यात आला. सिनवार हा ओलिसांना सोडण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे.

हमासला मोठा झटका, एअर स्ट्राईकमध्ये नेता मोहम्मद सिनवार ठार, इस्त्रायलचा दावा काय?
इस्त्रायल हमास युद्ध
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 01, 2025 | 10:15 AM

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यानंतर आता इस्त्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी हमासला मोठा झटका दिल्याचा दावा केला आहे. एअर स्ट्राईकमध्ये हमासचा कमांडर मोहम्मद सिनवार मारल्या गेला. इस्त्रायलच्या अधिकाऱ्यानुसार, 13 मे रोजीच्या हवाई हल्ल्यात तो मारल्या गेला. एका रुग्णालया खाली असलेल्या सुरुंगात करण्यात आला. येथेच सिनवार लपल्याचा संशय होता. त्यामुळेच तिथे हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ठार झालेल्या सिनवारचे अनेक फोटो समोर आले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच गाजा पट्टीत ही कारवाई करण्यात आली. एका रुग्णालयाच्या खाली सुरूंग खोदण्यात आला होता. त्यात मोहम्मद सिनवार हा लपला होता. हवाई हल्ल्यात या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आला. या कारवाईत सिनवार याच्यासह अजून दो कमांडर मारल्या गेले. सिनवार हा हमासमधील प्रमुख नेता होता. तोच गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलच्या ओलिसांना सोडण्यास विरोध करत होता. तो युद्ध विरामाला पण विरोध करत होता. त्यामुळे हमास आणि इस्त्रायलमध्ये तणाव वाढला होता.

इस्त्रायलच्या सैन्याने सिनवार मारल्या गेल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहून यांनी सुद्धा सिनवार ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मोहम्मद सिनवार याचा मोठा भाऊ याह्या सिनवार हा हमासचा प्रमुख होता. ऑक्टोबर 2023 मध्ये इस्त्रायलवर हल्ला करण्यामागे याह्या हाच होता. तो गेल्यावर्षी इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात मारला गेला होता.

मोहम्मद सिनवार कोण?

मोहम्मद हा याह्या सिनवार याचा लहान भाऊ आहे. जुलै 2004 मध्ये हमासच्या लष्करी विंगचे त्याला प्रमुखपद देण्यात आले होते. तो हमासच्या खान युनिस ब्रिगेडचा कमांडर पण होता. सिनवार याची माहिती देणाऱ्याला इस्त्रायलने 3,00,000 डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. तर याह्या खान हा इस्त्रायलने 16 ऑक्टोबर 2024 रोजी केलेल्या हल्ल्यात ठार झाला होता. आता मोहम्मद सुद्धा ठार झाल्याने हमासला हा मोठा झटका मानण्यात येत आहे. तर दुसरीकडे ओलीस सुटण्याची आणि युद्ध विरामाकडे वाटचाल होण्याची शक्यता पण बळावली आहे.