India-Israel : भारतीय गायीचे मूत्र पितात आणि चाटतात, इस्त्रायली धर्मगुरुचं संतापजनक वक्तव्य, सच्चा दोस्ताकडून अशी अपेक्षी नव्हती

India-Israel इस्त्रायली धर्मगुरुचं हिंदूवर संतापजनक वक्तव्य केलं आहे. भारतीय गायीचे मूत्र पितात आणि चाटतात, असं विधान त्यांनी केलं.

India-Israel : भारतीय गायीचे मूत्र पितात आणि चाटतात, इस्त्रायली धर्मगुरुचं संतापजनक वक्तव्य, सच्चा दोस्ताकडून अशी अपेक्षी नव्हती
Rabbi Yosef Mizrachi
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 8:30 AM

हिंदू धर्मीयांच्या श्रद्धा आणि गोपूजेविषयी एका इस्त्रायली गुरूने वादग्रस्त टिप्पणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिंदू धर्मावरील विधानाने इस्त्रायली-अमेरिकेचे रब्बी योजी मिझराही वादात सापडले आहेत. त्यांचं हिंदू धर्मावरील वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून भारतीय आणि इस्त्रायली नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे. या व्हिडिओतून त्यांनी हिंदू धर्मीय करत असलेल्या गोपूजेची खिल्ली उडवली आहे. त्यासोबत या धर्मगुरूने भारतीय डॉक्टरांवर अपमानास्पद वक्तव्य केलं आहे.

भारतीय गायीचे मूत्र पितात आणि चाटतात, असं संतापजनक वक्तव्य इस्त्रायली गुरूने केलं आहे. त्यानंतर भारतातील डॉक्टर देखील असंच कृत्य करतात, असे त्यांनी म्हटलं. त्यांनी नवी दिल्लीच्या रस्त्यावर गायीमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीची देखील खिल्ली उडवली. त्यांनी यावेळी भारतीयांच्या अनेक धार्मिक परंपराचा अपमान केला आहे.  सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये इस्त्रायली धर्मगुरूने एका भारतीय व्यक्तीचा देखील उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की, हा भारतीय व्यक्ती माझं फेसबुक पेज मॅनेज करायचा. त्याला यहुदी धर्म स्वीकारण्याची इच्छा होती. त्यांनी याच व्यक्तीचं कुटुंब आणि भारतातील गोपूजेच्या परंपरेवर टीका केली होती.

Loading...

मिझराही यांनी दावा केला की, काही हिंदू घरात गायीला आणतात. गायीने मूत्र विसर्जन केल्यानंतर त्याला चाटतात. तसेच भारतीय लोक मोठ्या श्रद्धेने गायीचे मूत्र खरेदी करतात’. भारतीय डॉक्टरांवरही वादग्रस्त टिप्पणी केली. त्यांनी पुढे म्हटलं की, कोणी एखादा रुग्ण नवी दिल्लीतील रुग्णालयातील डॉक्टरकडे गेला असेल. तर त्या डॉक्टरने देखील रात्री गोमूत्र प्यायलेलं असते. रस्त्यावर बसलेल्या गायीला हटवण्याची देखील कोणाची हिंम्मत नसते. या गायीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलं की, मी देवाचे आभार मानतो. त्यांनी मला हिंदू धर्मीयांसारखं बनवलं नाही’. मिझराही यांच्या विधानाने भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक भारतीय मिझराहींच्या वक्तव्याचा निषेध करत आहे. भारतातील नेटकरी आता मिझराही यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us