
अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीनच्या तपासाशी संबंध कागदपत्रे आणि फोटो प्रसिद्ध केले. यानंतर फक्त अमेरिकाच नाही तर जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेत लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही जुने धक्कादायक फोटो व्हायरल झाली. काही फोटोंमध्ये तर अत्यंत कमी वयाच्या मुलासोबत डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. एका फोटोमध्ये लहान वयाची मुलगी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाजवळ बसून मसाज करताना मुलगी दिसली. पारदर्शकता आणि सरकारी माहिती उघड करण्याच्या मर्यादांबद्दल नवीन प्रश्न निर्माण करत आहे. नवीन फोटो समोर आल्याने लोकांमध्ये संताप आहे. बऱ्याच फोटोंमधून दिसत आहे की, त्या लहान मुली असून त्यांचे शोषण केले जात आहे. लहान मुलींचे किस घेतले जात आहे, त्यांना मिठी मारल्या जात आहेत.
नुकताच मिळालेल्या वृत्तांनुसार, दृष्य एपस्टीनच्या खाजगी जेटमध्ये आणि त्याच्या लिटल सेंट जेम्स बेटावरील इस्टेटसारख्या ठिकाणी करण्यात आले होते आणि कायदेशीर मुदत पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या मोठ्या सामग्रीचा हा एक भाग आहे. हेच नाही तर ही माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी अमेरिकेच्या न्याय विभागाने बहुतेक ओळखविषयक माहिती वगळली. मात्र, या फोटोंमुळे लोकांमध्ये चांगलाच संताप बघायला मिळत आहे.
या वर्षी स्वाक्षरी केलेल्या कायद्यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीचा उद्देश गोपनीय ठेवलेले ग्रँड ज्युरीचे साहित्य, तपास फाइल्स आणि फोटो सार्वजनिक तपासणीसाठी खुली करणे हा होता. अमेरिकेतील मोठे उद्योगपती आणि राजकारणी लोकांची फोटो पुढे आल्याने त्यांचा खरा चेहरा थेट जगापुढे आला. अत्यंत लहान वयाच्या मुलींचे शोषण करताना अनेक जगप्रसिद्ध नावे दिसली.
या फाईल्स ओपन झाल्यानंतर सातत्याने आरोप केला जात आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटो लपवण्यात आली असून काही फाईल्स या प्रसिद्धच झालेल्या नाही. मोठा घोळ या फाईल्समध्ये असल्याचा दावा केला जात आहे. अहवालांनुसार, शेकडो पानांमध्ये पूर्णपणे किंवा अंशतः बदल करण्यात आले आहेत. 16 फाइल्स काढून टाकण्यात आल्या. ज्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एपस्टीनसोबतचा एक ऐतिहासिक Ha’a असलेल्या फाइलचाही समावेश आहे.