अमेरिकेच्या मध्यावती निवडणूका हरताच ट्रम्प यांच्यावर जे.डी.व्हान्स झाले नाराज, म्हणाले इराण युद्धानेच बाजी पलटली..
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी मध्यावधी निवडणुकांमध्ये पक्षाच्या खराब कामगिरीसाठी इराण युद्धाला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक मतदारांनी यावेळी पक्षाला मतदान केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील मध्यावती निवडणूकांचे निकाल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धक्कादायक ठरले आहेत. रिपब्लिकन पार्टीचे अनेक मोठे चेहरे या निवडणूकीत हरले आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीने सिनेटवरील आपली पकड हरवली आहे. कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी मिडटर्ममधील हा मोठा पराभव आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या वतीने राष्ट्राध्यक्षांच्या धोरणावर प्रश्न केले जात आहे. उप राष्ट्राध्यक्ष जे.डी व्हान्स यांनी पराभवाची चार कारणे सांगितली आहेत. त्यातील सर्वात मोठे कारण इराण युद्ध म्हटले आहे.
मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, जेडी व्हान्स यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया साइटवर एक विस्तृत पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक मतदारांनी प्रशासनाच्या निषेधार्थ आपली भूमिका बदलली आहे.
ते म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचा पराभव प्रामुख्याने त्यांचे समर्थक मतदान केंद्रांवर हजर न झाल्यामुळे झालेला नाही. उलट, त्यांनी असा युक्तिवाद केला की, २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ज्या अनेक लोकांनी ट्रम्प-व्हान्स जोडीला मतदान केले होते, ते ३ नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पक्षाच्या विरोधात गेले आहेत.
ट्रम्प समर्थक का नाराज ?, व्हान्स यांनी सांगितली चार कारणे
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी पराभवाची चार मुख्य कारणे सांगितली. यामध्ये इराण युद्ध, वाढती महागाई, ‘अमेरिका फर्स्ट’ अजेंड्यावरील प्रशासनाचे धोरण आणि अमेरिकेचे इस्रायलसोबतचे संबंध यांचा समावेश होता. “त्या युद्धामुळेच आपला पराभव झाला,” असे व्हान्स यांनी लिहिले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, पुढील सहा वर्षांसाठी सिनेटवरील नियंत्रण गमावणे योग्य आहे असा युक्तिवाद लोकांना करायचा असेल, तर त्यांनी तो करावा. “तुम्ही सहमत असाल किंवा असहमत, पण किमान हे एक प्रामाणिक विधान आहे,” असे ते म्हणाले.
व्हान्स यांच्या वक्तव्यातून ट्रम्प प्रशासनातील वातावरण स्पष्टपणे दिसून येते, जिथे त्यांना वाटते की इराण युद्ध त्यांच्यासाठी एक राजकीय ओझे बनले आहे.
व्हान्स म्हणाले की, विश्लेषकांनी चार प्रमुख मुद्दे मांडले
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले की, मध्यावधी निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी खालावत असल्याची त्यांना जाणीव होती. या पराभवाचे विजयात रूपांतर करण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्न त्यांनी विश्लेषकांना विचारला. व्हान्स यांच्या मते, तज्ज्ञांनी चार प्रमुख मुद्दे ओळखले आहेत: युद्ध संपवणे, महागाई कमी करणे आणि उरलेले दोन: ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाप्रती प्रशासनाची वचनबद्धता आणि इस्रायलसोबत वॉशिंग्टनच्या संबंधांमध्ये परिवर्तन घडवणे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यांच्या समर्थकांनी अनेक मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा दिला. मात्र, जेव्हा अमेरिकेतील वाढत्या महागाईचा प्रश्न आला, तेव्हा समर्थकांनी ट्रम्प यांची साथ सोडली. किमान, मध्यावधी निवडणुकीचे निकालही असेच चित्र दर्शवत आहेत. इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, जे ट्रम्प यांच्यासाठी एक मोठी डोकेदुखी ठरले. ही निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी इतके टोकाचे प्रयत्न केले की त्यांनी रशियाकडून डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली. पण यामुळेही त्यांचा पराभव टळला नाही.
ट्रम्प यांच्या मुलानेही जेडी व्हान्स यांना पाठिंबा दिला. जेडी व्हान्स यांनी अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील पराभवाचे कारण म्हणून इराण युद्धाचा उल्लेख केला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी व्हान्स यांच्या विश्लेषणाला पाठिंबा दिला. त्यांनी व्हान्स यांची एक्स-पोस्ट शेअर करत लिहिले की, त्यातील प्रत्येक शब्द १००% अचूक आहे.