कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांसह उड्डाण, विमान इमारतीवर धडकून अपघात

कझाकिस्तानच्या अल्मटी विमानतळाजवळ 100 प्रवाशांना घेऊन जाणार विमान (kazakhstan plane crash) कोसळंल. सध्या घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरु आहे.

कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांसह उड्डाण, विमान इमारतीवर धडकून अपघात

नूर सुल्तान (कझाकिस्तान) : कझाकिस्तानच्या अल्मटी विमानतळाजवळ 100 प्रवाशांना घेऊन जाणार विमान (kazakhstan plane crash) कोसळंल. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अल्मटी विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात हे विमान दोन मजली इमारतीला आदळलं. सध्या घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरु आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात (kazakhstan plane crash) आहे.

अपघातग्रस्त झालेले हे विमान अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी जात होते. या विमानात 95 प्रवाशी आणि 5 क्रू मेंबर्सचा समावेश होता. हे विमान बेक एअर नावाच्या कंपनीचे होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाला असून 9 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. यात 6 लहान मुलांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान उड्डाण घेतल्यानंतर वैमानिकाचा ताबा सुटला. त्यामुळे ते विमान दुमजली इमारतीला जाऊन धडकले आणि क्रॅश झाले.

ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.22 मिनिटांनी घडली. या अपघातात प्रवाशांसह स्थानिक नागरिकही (kazakhstan plane crash) जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांनी याबाबतच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी एक विशेष चौकशी समितीही स्थापन केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान सध्या आपात्कालीन सेवा विमानतळावर दाखल झाल्या असून बचावकार्य वेगाने सुरु (kazakhstan plane crash) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *