पंतप्रधानांच्या राजीनाम्याने खळबळ, ब्रिटनच्या राजकारणात नेमकं काय घडतयं?

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपद आणि लेबर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 10 वर्षांत कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडणारे स्टार्मर हे सहावे ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याने खळबळ, ब्रिटनच्या राजकारणात नेमकं काय घडतयं?
keir starmer resignation
Image Credit source: Google
| Updated on: Jun 22, 2026 | 3:08 PM

युरोपमधून मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपद आणि लेबर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 10 वर्षांत कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडणारे स्टार्मर हे सहावे ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी डेव्हिड कॅमेरॉन, थेरेसा मे, बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांनाही कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. स्टार्मर यांच्या या निर्णयामुळे ब्रिटनच्या राजकारणाबाबत जगभरात चर्चांना उधान आले आहे.

पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना स्टार्मर यांनी सांगितले की, ‘पक्षामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जात होता की आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी तेच योग्य व्यक्ती आहेत का? आता पक्षाकडून मला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून मी ते आदरपूर्वक स्वीकारत आहे. आता पक्षाची धुरा नवीन नेत्याने स्वीकारून पुढील निवडणुकीकडे पक्षाला घेऊन जाण्याची वेळ आली आहे.’

स्टार्मर यांनी राजीनामा का दिला?

कीर स्टार्मर यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ‘माझ्या पक्षात हा प्रश्न उपस्थित होत होता की पुढील निवडणुकीत मीच नेतृत्व करणार का. संसदीय पक्षाला माझ्या नेतृत्वाबाबत शंका होती. अनेकांना वाटत होते की मी यशस्वी होऊ शकणार नाही. मी त्या मतांचा आदर केला आणि म्हणूनच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी ज्यूविरोधी विचारसरणीला पक्षातून मुळासकट दूर केले. राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी पंतप्रधान झालो, तो माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण होता.’

आता पुढे काय?

स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर लेबर पक्ष आता नवीन नेत्याची निवड करण्यासाठी बैठक घेणार आहे. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले बर्नहॅम हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. त्यांना 100 खासदारांचा जाहीर पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. बर्नहॅम आज संसदेत खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात मेकरफील्ड मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली होती.

स्टार्मर यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

आपल्या भाषणात स्टार्मर म्हणाले की, ‘पंतप्रधान होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. जेव्हा मी लेबर पक्षाची धुरा स्वीकारली, तेव्हा पक्ष अत्यंत कठीण परिस्थितीत होता. अनेकांना वाटत होते की पक्षाचे राजकीय भविष्य संपले आहे, परंतु त्यांनी पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. मा माझ्या निर्णयाबाबत ब्रिटनच्या राजांशीही चर्चा केली आहे. नवीन नेत्याच्या निवडीसाठी निवडणूक झाल्यास, सप्टेंबरमध्ये संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लेबर पक्षाचा नवा नेता निवडला जाईल.’

Follow Us