Khaleda Ziya : सिंपल साडी, डार्क सनग्लासेस आणि एलिंगट दागिने… खालिदा झिया यांच्या स्टाइलची सर्वत्र होती चर्चा !

Khaleda Ziya Style Statement : खालिदा झिया यांचे नाव बांगलादेशच्या इतिहासात जिवंत राहील. देहरूपाने त्या आपल्यात नसल्या तरी त्यांची आठवण केवळ बांगलादेशातच नव्हे तर दक्षिण आशियाई राजकारणातही लक्षात ठेवली जाईल. साधेपणा हेच सर्वात मोठं स्टाइल स्टेटमेंट असल्याचं त्यांनी बऱ्याचदा त्यांच्या पेहरावातून दाखवून दिलं.

Khaleda Ziya : सिंपल साडी, डार्क सनग्लासेस आणि एलिंगट दागिने...  खालिदा झिया यांच्या स्टाइलची सर्वत्र होती चर्चा !
खालिदा झिया
| Updated on: Dec 30, 2025 | 9:42 AM

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि बीएनपी प्रमुख खालिदा झिया यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्या जाण्यान बांगलादेशमध्ये शोककळा पसरली आहे. माजी पंतप्रधान असलेल्या खालिदा झिया यांना सामान्यतः राजकारण, संघर्ष आणि सत्तेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. मात्र, त्यांचं फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट देखील कमी प्रसिद्ध नव्हतं. खालिदा झिया यांचे कपडे कधीही ग्लॅमर किंवा शोसाठी नव्हते, तर त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व, राजकीय भूमिका आणि मानसिक शक्ती प्रतिबिंबित व्हायची, त्यासाठी ते एक शक्तिशाली माध्यम होतं.

साडी : सत्ता आणि साधेपणाचे मिश्रण

खालिदा झिया यांच्या साड्या खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या बहुतेक फिकच रंगाच्या सुती किंवा रेशमी साड्या परिधान करायच्या, ज्यामध्ये जास्त भरतकाम किंवा दिखाऊ डिझाइन नसायचे. पांढरा, क्रीम, हलका गुलाबी, आकाशी निळा आणि ऑफ-व्हाइट हे त्यांचे आवडते रंग होते. अनेक प्रसंगी, त्यांनी काळीया बॉर्डर असलेली साधी पांढरी साडी देखील परिधान केली, जी तिच्या समर्थकांनी शोक आणि संघर्षाचे प्रतीक मानली. आपण सामान्य जनतेशी जोडलेल्या नेत्या आहोत, दिखावा आणि शाही थाच करणारी राजकारणी नव्हे हे त्यांनी या साध्या साड्यांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला.

काळे सनग्लासेस

खालिदा झिया यांचा सर्वात वेगळा आणि त्यांची ठळक ओळख दाखवणारा फॅशन घटक म्हणजे त्यांचा मोठा काळा चष्मा. हे चष्मे केवळ सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी साधन नव्हतं तर ते एक शक्तिशाली राजकीय प्रतीक देखील बनले. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे सनग्लासेस त्यांचे कणखर, निडर आणि गूढ व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करायचे. निदर्शनं असो की न्यायालयीन हजेरी आणि सार्वजनिक सभांमध्ये या सनग्लासेसवर कॅमेऱ्यांचा फोक असायचा. विशेष म्हणजे त्यांनी कधीच एखाद्या लोकप्रिय, विशिष्ट ब्रांडचे सनग्लासेस वापरले नाह, की त्यांचा प्रचार केला नाही. त्यांचे सनग्लासेस साधे दिसायचे, पण होते कणखर.

कमीत कमी पण प्रभावशाली दागिने

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच, खालिदा झिया यांचे दागिने, विनम्र आणि साधे होते. त्या अनेकदा सोन्याचे लहान कानातले, मोत्याचे कानातले, साध्या चेन आणि कधीकधी छोटसं ब्रेसलेट एवढंच घातलेल्या दिसायच्या. त्यांनी कधी मोठे हार, चमकते दागिने किंवा फॅशनेबल ज्वेलरीला प्राधान्य दिलं नाही. हे त्यांनी जाणूनबूजन केलं असं बोललं जातं. जेणेकरून त्या स्वत:ला संघर्ष करणाऱ्या नेत्या आणि साधी स्त्री म्हणून दाखवू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पुरते मर्यादित ठेवत असत.

फॅशन नव्हे, स्टाइलमधून दिला थेट मेसेज

खालिदा झिया यांची फॅशन ट्रेंड सेट करण्यासाठी नव्हती, तर राजकीय संदेश देण्याचा तो एक मूक मार्ग होता. सत्तेत असतानाही त्यांनी साधेरपणा सोडला नाही आणि संघर्षाच्या काळातही त्यांची ओळख टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या पोशाखातून दिसून आली. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यावरही, साधी साडी, काळे चष्मे आणि साध्या दागिन्यांचा वापर यामुळे त्या दक्षिण आशियातील सर्वात अद्वितीय आणि संस्मरणीय महिला नेत्यांपैकी एक बनल्या. कधीकधी साधेपणा हेच मोठं स्टाइल स्टेटमेंट असतं हे त्यांनी त्यांच्या पेहरावातून दाखवून दिलं.