कोणत्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता, मोदी ‘Air India One’ मधून बांग्लादेशला, या VVIP विमानाचं वैशिष्ट्यं काय?

| Updated on: Mar 26, 2021 | 4:10 PM

भारताचं नवं व्हीव्हीआयपी (VVIP) विमान एअर इंडिया-1 (Air India One Plane) पहिल्यांदाच परदेशातील दौऱ्यासाठी वापरण्यात आलंय.

कोणत्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता, मोदी ‘Air India One’ मधून बांग्लादेशला, या VVIP विमानाचं वैशिष्ट्यं काय?
Follow us on

Air India One Plane VVIP Boeing 777 ढाका : पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा दोन कारणांमुळे खास मानला जात आहे. पहिलं कारण कोरोना काळातील पंतप्रधान मोदींचा हा पहिला परदेश दौरा (PM Modi Bangladesh Visit) आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारताचं नवं व्हीव्हीआयपी (VVIP) विमान एअर इंडिया-1 (Air India One Plane) पहिल्यांदाच परदेशातील दौऱ्यासाठी वापरण्यात आलंय. ऑक्टोबर 2020 मध्ये हे विमान भारतात दाखल झालं (Know all about Air India One Plane VVIP Boeing 777 which PM Modi use to visit Bangladesh).

मोदी खास व्हीव्हीआयपी विमानानं बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहचले. या ठिकाणी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी स्वतः विमानतळावर हजर राहून मोदींचं स्वागत केलं. या दौऱ्यात दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात आलाय. त्यामुळेच पहिल्यांदाच परदेश दौऱ्यासाठी बोइंग 777 (Boeing 777) विमानाचा वापर झालाय. या विमानाचा पहिल्यांदा वापर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली ते चेन्नई प्रवासासाठी केला होता. मात्र, परदेश दौऱ्यासाठीचं हे पहिलंच उड्डान आहे.

बोइंग 777 (Boeing 777) विमानाची वैशिष्ट्ये काय?

बोइंग बी777-300 ईआर (B777-300ER) हे विमान दूरच्या प्रवासासाठी वापरलं जातं. अशा प्रवासासाठी भारतात आधी बोइंग 747-400 एअरक्राफ्ट वापरलं जायचं. आता त्याची जागा नव्या बोइंग बी777-300 ईआर (B777-300ER) विमानाने घेतली आहे. यात अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. हे विमान आधीच्या विमानाच्या तुलनेत कमी इंधनात अधिक अंतर पार करते (Air India One B777 Aircraft). या विमानाची जबाबदारी वायुसेनेच्या संचार स्क्वाड्रनवर आहे. त्यांच्याकडे सध्या दोन नवे बोइंग 777 विमानं आहेत.

क्षेपणास्त्राचा हल्ला परतवण्याचीही क्षमता

हे व्हीव्हीआयपी विमान 900 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. विशेष म्हणजे शत्रूच्या रडार सिस्टमला जाम करण्यासाठी या विमानात जॅमरचीही सुविधा आहे. हे विमान इतकं सुरक्षित आहे की यावर क्षेपणास्त्र हल्ला झाला तरी त्याचा परिणाम होणार नाही. या विमानात हवेतल्या हवेतच इंधन भरण्याची सुविधाही देण्यात आलीय. या विमानात अत्याधुनिक मिसाईल संरक्षण प्रणाली असलेल्या या विमानात लार्ज एअरक्राफ्ट काउंटरमीजर्स म्हणजेच LAIRCM आणि सेल्फ प्रोटेक्शन सूट्स म्हणजे SPS देखील बसवण्यात आले आहेत. हे विमान हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास देखील सक्षम आहे (Air India One Manufacturer). अमेरिकेकडून हे विमान खरेदी करण्यात आले.

अमेरिकेच्या एअरफोर्स वनसारखे फीचर

एअर इंडिया वन विमानात एक मोठं ऑफिस आणि कॉन्फरन्स रूमसोबतच लॅबची सुविधाही आहे. लांबच्या प्रवासाचा विचार करुन या सुविधा विमानात देण्यात आल्या आहेत (Air India One Aircraft). हे विमान भारत ते अमेरिका असा लांब पल्ल्याचा प्रवास इंधनासाठी जमिनीवर न उतरता पूर्ण करु शकते. या विमानाचे सुरक्षा फीचर अमेरिकेच्या अध्यक्षांचं विमान एअरफोर्स वनसारखे आहेत. या विमानात दोन GE90-115 इंजिन आहेत. कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती देण्यासाठी विमानात शक्तीशाली सेंसॉर बसवण्यात आले आहेत. हे विमान पंतप्रधानांसोबतच देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील वापरु शकतात.

हेही वाचा :

World News Bulletin: इस्राईल निवडणुकीत नेतन्याहूंच्या पक्षाला बहुमत नाहीच, जगातील सर्वात मोठ्या 5 बातम्या

बांग्लादेशच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

VIDEO: आकाशातच विमानाच्या इंजिनमध्ये स्फोट, 241 लोकांचा जीव टांगणीला, अंगाचा थरकाप उडवणारी दृष्ये

व्हिडीओ पाहा :

Know all about Air India One Plane VVIP Boeing 777 which PM Modi use to visit Bangladesh