World News Bulletin: इस्राईल निवडणुकीत नेतन्याहूंच्या पक्षाला बहुमत नाहीच, जगातील सर्वात मोठ्या 5 बातम्या

बुधवारी (24 मार्च) आशियापासून (Asia) ते मध्य पूर्वेपर्यंत (Middle east) जगभरात अनेक मोठ्या घडमोडी घडल्या. यावर लोकांचं लक्ष खिळून होतं.

World News Bulletin: इस्राईल निवडणुकीत नेतन्याहूंच्या पक्षाला बहुमत नाहीच, जगातील सर्वात मोठ्या 5 बातम्या


वॉशिंग्टन : बुधवारी (24 मार्च) आशियापासून (Asia) ते मध्य पूर्वेपर्यंत (Middle east) जगभरात अनेक मोठ्या घडमोडी घडल्या. यावर लोकांचं लक्ष खिळून होतं. यामध्ये जगभरात आपल्या सैन्य शक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इस्राईलमधील निवडणूक निकालापासून पाकिस्तानमधील एका गिनिज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंतच्या बातम्यांचा समावेश आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प याच्या कार्यकाळात बंद करण्यात आलेल्या भारत आणि अमेरीका द्विपक्षीय चर्चेबाबतही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. याशिवाय रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये (Congo) डेनिस सासयू एन ग्योसू यांचा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकालही ऐतिहासिक ठरलाय. चला तर मग समजून घेऊयात 2 मिनिटात जगभरातील 5 मोठ्या बातम्यांचा आढावा (World News Bulletin including Israel and Congo election India America relation and Pakistan 24 March 2021).

1. जगभरात आपल्या सैन्य शक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इस्राईलमध्ये 2 वर्षात तब्बल 4 वेळा निवडणुका झाल्या. मात्र, यात सत्ताधारी नेतन्याहूंच्या पक्षाला बहुमत मिळवता आले नाही. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे तेथे आता पाचव्यांदा निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे.

2. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प याच्या कार्यकाळात बंद भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये अंतर्गत सुरक्षेवरील द्विपक्षीय चर्चा बंद झाली होती. बायडेन सरकारने ही चर्चा पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. या चर्चेसाठी दोन्ही देश सहमत झाले आहेत.
3. रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये (Congo) डेनिस सासयू एन ग्योसू यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणुकीत विजय नोंदवला आहे. ते मागील 36 वर्षांपासून सत्तेत आहेत. यावेळी त्यांना तब्बल 88.57 मतं मिळाली.

4. ब्रिटनचे राजकुमार हॅरी यांनी राजघराण्यातील आपलं पद सोडल्यानंतर ते आता बेटरअप या एका अमेरिकन कंपनीतील टीमसोबत काम करणार आहेत. ही एक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीत ते चीफ इंपॅक्ट ऑफिसर या पदावर काम करतील.

5. पाकिस्तानमधील दोन मुलींनी तिन गिनिज वल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. त्यांनी भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांना याबाबत मागे टाकलंय. यापैकी एका मुलीने जो रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे तो आधी भारताच्या नावावर होता. हा विक्रम आहे वर्ल्ड मेमरी चॅम्पियन 2020’. या मुलीने 15 मिनिटात तब्बल 410 शब्द अनुक्रमात आठवणून दाखवले आहेत.

हेही वाचा :

‘या’ देशात कांदे बटाट्यापेक्षाही सहजपणे बंदुका उपलब्ध, ‘गन कल्टर’चा जगातील एकमेव देश

नोकरीवरुन काढल्याने 1200 अकाऊंट डिलिट, दिल्लीहून अमेरिकेत परतलेल्या भारतीयाला 2 वर्षांचा तुरुंगवास

Colorado Firing: अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 नागरिकांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

World News Bulletin including Israel and Congo election India America relation and Pakistan 24 March 2021

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI