AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ देशात कांदे बटाट्यापेक्षाही सहजपणे बंदुका उपलब्ध, ‘गन कल्टर’चा जगातील एकमेव देश

अमेरिकेत (US) मागील अनेक वर्षांपासून होणाऱ्या गोळीबाराच्या घटनेत लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांना आपला जीव गमवावा लागलाय (Shooting Incidents in US).

'या' देशात कांदे बटाट्यापेक्षाही सहजपणे बंदुका उपलब्ध, 'गन कल्टर'चा जगातील एकमेव देश
बंदूक - प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 24, 2021 | 5:27 PM
Share

US Gun Culture वॉशिंग्टन : अमेरिकेत (US) मागील अनेक वर्षांपासून होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांना आपला जीव गमवावा लागलाय (Shooting Incidents in US). या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. सोमवारी (23 मार्च) देखील कोलोराडो येथील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱ्यासह 10 लोकांची हत्या करण्यात आलीय. एका आठवड्यात अमेरिकेत घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे. यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेत बंदूक कायद्यावर (US Gun Law) निर्बंध लादण्याची चर्चा सुरु झालीय. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावरही याबाबत कायदा करण्यासाठी दबाव वाढलाय (Many death due to Gun Culture of US Joe Biden may change gun law).

जो बायडन यांनी अध्यक्षीय निवडणुकीत जिंकल्यास बंदूक कायद्यात काही सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं होतं (US Government Gun Laws). आता झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर जो बायडन (Joe Biden on Gun Laws) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी आता एक मिनिटही वाट पाहू शकत नाही. आपल्याला आपल्या भविष्यात अनेक जव वाचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊलं उचलायचे आहेत. मी हाऊस आणि सिनेटमधील माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी या कायद्यात बदल करण्यासाठी सहकार्य करावं.’

अमेरिकेत बंदूक कायद्यावरुन जोरदार राजकारण

अमेरिकेत बंदूक कायद्यावरुन नेहमीच जोरदार राजकारण होत आलंय. अमेरिकेच्या संविधानातील दुसऱ्या दुरुस्तीने (US Gun Law Second Amendment) नागरिकांना बंदूक बाळगण्यासाठी कायदेशीर तरतूद केलीय. असं असलं तरी त्यात बंदूक वापरण्यासाठी काही नियमावलीही देण्यात आलीय. यावरुन अमेरिकेतील एक पक्ष बंदूक कायद्याच्या समर्थनार्थ आहे, तर दुसरा पक्ष या कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्ती करण्याच्या बाजूचा आहे. बंदूक कायद्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरु असतानाच अमेरिकेत अगदी सहजपणे बंदुका उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय.

बेछुट गोळीबारांच्या घटनांमध्ये अनेक नागरिकांचा बळी

रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) बहुतांश नेते बंदूक मिळण्याबाबतच्या अटी कमी करुन नागरिकांना बंदुका सहज उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी करतात. बंदूक बाळगल्याने लोक स्वतःचं संरक्षण करु शकतात आणि बंदुकीशी संबंधित खेळातही त्याचा उपयोग करु शकतात, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. दुसरीकडे डेमोक्रेटिक पक्षाकडून बंदूक मिळण्याच्या नियमांमध्ये वाढ करुन बंदूक बाळगण्यावर नियंत्रणाची मागणी होत आहे. बंदुका सहज उपलब्ध होत असल्याने बेछुट होणाऱ्या गोळीबारात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे बंदुका वापरण्यावर काही निर्बंध असावेत, अशी डेमोक्रेटिक पक्षाची (Democratic Party) भूमिका आहे.

हेही वाचा :

CCTV VIDEO | नागपुरात माजी नगरसेवकाच्या घरी चोरी, बंदुकीच्या धाकाने पत्नीची लूटमार

आधी ‘वादळाचा’ इशारा, आता बंदुकांसह इन्स्टा स्टोरी, इचलकरंजीत गुन्हेगारांची हिंमत वाढली

VIDEO: ‘दुसरी नाही, ही हातातील बंदुकच हवी’, रस्त्यावर सैनिकाला पाहून पाहून हट्ट करणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहा :

Many death due to Gun Culture of US Joe Biden may change gun law

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.