आधी ‘वादळाचा’ इशारा, आता बंदुकांसह इन्स्टा स्टोरी, इचलकरंजीत गुन्हेगारांची हिंमत वाढली

अक्षय पाटील आणि गौरव मरडे या दोघांनी बंदूक घेऊन इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याचं समोर आलं आहे

आधी 'वादळाचा' इशारा, आता बंदुकांसह इन्स्टा स्टोरी, इचलकरंजीत गुन्हेगारांची हिंमत वाढली
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 12:15 PM

इचलकरंजी : तलवार-बंदुका हातात घेऊन व्हॉट्सअॅप-इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवण्याचं प्रमाण इचलकरंजी शहरात वाढल्याचं दिसत आहे. अक्षय पाटील आणि गौरव मरडे या सराईत गुन्हेगारांनी बंदूक घेऊन इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. आधीच, पॅरोलवर सुटलेल्या हत्येच्या आरोपीने पुन्हा वादळ आणण्याचा इशारा दिल्याची घटना ताजी असतानाच हा व्हिडीओ समोर आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. (Ichalkaranji Criminals put Instagram Story with Guns Sword)

इचलकरंजी शहराच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी बीबी महामुनी यांनी अशा गुन्हेगारांवर कारवाई सुरु केली आहे. अक्षय पाटील आणि गौरव मरडे या दोघांनी बंदूक घेऊन इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याचं समोर आलं आहे. दोन्ही आरोपी शिवाजीनगर पोलिसात रेकॉर्डवर आहेत.

इचलकरंजीत बंदूक-तलवारीसह फोटोची क्रेझ

शहरात गुंडगिरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार सोशल मीडियावर बंदूक तलवारींसह वाढदिवस करत स्टेटस ठेवत आहेत. पोलिसांनी आरोपींवर कारवाई करुन त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्‍या वादळाची तयारी सुरु’

इचलकरंजीत स्टेशन रोडवरील इदगाह मैदान परिसरात 10 डिसेंबर 2019 रोजी पूर्ववैमनस्यातून दीपक महादेव कोळेकर (वय 26 रा. राधा कन्हैय्या प्रोसेसमागे लक्ष्मी वसाहत कोरोची) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आकाश वासुदेव, अक्षय नरळे, मेहबूब उकले, आदिनाथ बावणे, सुनिल वाघवे, कासिम नदाफ आणि सागर आमले या सात जणांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्वजण जामिनावर बाहेर आहेत.

हत्येच्या घटनेला वर्ष झाल्याच्या निमित्ताने आकाश वासुदेव याने व्हॉट्सअॅपवर ‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्‍या वादळाची तयारी सुरु’ अशा आशयाचा व्हिडीओ स्टेटस् म्हणून ठेवला होता. या संदर्भातील माहिती पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांना समजल्यानंतर त्यांच्या आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर यांच्या पथकाने वासुदेवला सोमवारी रात्री ताब्यात घेतलं. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

 पाहा व्हिडीओ : संबंधित बातम्या :

मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी सुरु, पॅरोलवरील आरोपीच्या स्टेटसने खळबळ

सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ काही तासात उकललं, बोरांच्या वाटणीवरुन मित्रानेच संपवलं

(Ichalkaranji Criminals put Instagram Story with Guns Sword)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.