नोकरीवरुन काढल्याने 1200 अकाऊंट डिलिट, दिल्लीहून अमेरिकेत परतलेल्या भारतीयाला 2 वर्षांचा तुरुंगवास

नोकरीवरुन काढल्याने एखादी व्यक्ती रागाच्या भरात काय करेल याचा काही नेम नाही.

नोकरीवरुन काढल्याने 1200 अकाऊंट डिलिट, दिल्लीहून अमेरिकेत परतलेल्या भारतीयाला 2 वर्षांचा तुरुंगवास


Indian sentenced to 2 years for deleting company accounts वॉशिंग्टन : नोकरीवरुन काढल्याने एखादी व्यक्ती रागाच्या भरात काय करेल याचा काही नेम नाही. अमेरिकेत एका भारतीयाने नोकरीवरुन काढल्याने बदला म्हणून कंपनीच्या सर्व्हरवरुन 1200 पेक्षा अधिक अकाऊंट डिलिट केल्याचा प्रकार घडलाय. त्याच्या या कृत्यासाठी कॅलिफोर्नियातील न्यायालयाने त्याला या प्रकरणी दोषी ठरवत 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दीपांशु खेर असं या भारतीयाचं नाव आहे. विशेष म्हणजे तो दिल्लीहून अमेरिकेत परतल्यानंतर 11 जानेवारी 2021 रोजी त्याला अटक करण्यात आली (Indian sentenced to 2 years prison for deleting company accounts after lost job).

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, दीपांशु खेर 2017 पासून मे 2018 पर्यंत अमेरिकेतील एका आयटी सल्लागार कंपनीत नोकरी करत होता. 2017 मध्ये या कंपनीकडे कार्ल्सबँड कंपनीचं काम आलं. या कंपनीला मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 मध्ये शिफ्ट व्हायचं होतं. या कामासाठी आयटी सल्लागार कंपनीने दीपांशु खरेला या कंपनीच्या मदतीसाठी पाठवले. मात्र, कंपनी खेर यांच्या कामावर समाधानी नव्हती. ही गोष्ट कंपनीने फर्मला सांगितली. जानेवारी 2018 मध्ये खेर यांच्या सल्लागार फर्मने खेर यांना मुख्यालयाला परत बोलावले. काही महिन्यांनंतर 4 मे 2018 रोजी या फर्मने खेर यांना नोकरीवरुन काढून टाकलं. यानंतर खेर दिल्लीला परत आला.

कंपनीचं सर्व्हर हॅक करुन 1500 पैकी 1200 अकाऊंट डिलिट

8 ऑगस्ट 2018 रोजी दीपांशु खरे पुन्हा भारतातून अमेरिकेत परतला. यानंतर त्याने कार्ल्सबँड कंपनीचं सर्व्हर हॅक केलं आणि 1500 पैकी 1200 अकाऊंट डिलिट केले. या प्रकरणी दीपांशु खेरला 11 जानेवारी 2021 रोजी भारतातून अमेरिकेत परतल्यानंतर अटक करण्यात आली. खेर याच्यावर आरोप आहे की, त्यांच्या या कृतीमुळे कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांच्या कामावर मोठा दुष्परिणाम झालाय. अकाऊंट डिलिट केल्याने दोन दिवस कंपनीचं काम पूर्णपणे ठप्प होतं.

‘हल्ला पूर्वनियोजित होता आणि बदला घेण्यासाठी केला’

खेर भारतातून अमेरिकेत परतला तेव्हा त्याला आपल्याविरोधात प्रलंबित वॉरंट असल्याची माहिती नव्हती. त्यामुळेच तो अमेरिकन पोलिसांच्या तावडीत सापडला. अमेरिकेचे कार्यवाहक अटॉर्नी रँडी ग्रॉसमॅन म्हणाले, ‘हे नुकसान विनाशकारी होतं.’ यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश मर्लिन हफ निकाल सुनावताना म्हटले, “खेरने जाणूनबूजून कंपनीवर एक गुंतागुंतीचा हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि बदला घेण्यासाठी केला होता.”

कंपनीला झालेल्या 5,67,084 डॉलर नुकसान भरपाई करण्याचे आदेश

न्यायालयाने खेर यांना यासाठी 2 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय 3 वर्षे अतिरिक्त देखरेखीखाली ठेवणे आणि त्याच्यामुळे कंपनीला झालेल्या 5,67,084 डॉलर नुकसानीची भरपाई करण्याचे आदेश दिलेत.

कंपनीचे आयटी विभागाचे उपाध्यक्ष म्हणाले, “खेर यांच्या या कृतीचा कंपनीच्या अंतर्गत आणि बाहेरील दोन्ही कामांवर परिणाम झालाय. कर्मचाऱ्यांचे अकाऊंट डिलिट झालेत. त्यामुळे त्यांना आपला ईमेल पाहणं देखील अशक्य झालंय. त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट लिस्ट, मीटिंग कॅलेंडर, डायरेक्टरी असं काहीही राहिलेलं नाही. ते पोहचवणं देखील शक्य होत नाहीये.”

हेही वाचा :

महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; वाचून तुम्हीही हादराल

तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

अचानक बंद झालं G-Mail आणि YouTube, तुमच्या पैशांवर मोठा सायबर हल्ला होण्याची भीती

व्हिडीओ पाहा :

Indian sentenced to 2 years prison for deleting company accounts after lost job