अचानक बंद झालं G-Mail आणि YouTube, तुमच्या पैशांवर मोठा सायबर हल्ला होण्याची भीती

सर्च इंजिन गुगलच्या ईमेल सर्व्हिस आणि जीमेलसह अनेक सेवा खंडित झाल्या आहेत. यामध्ये मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अचानक बंद झालं G-Mail आणि YouTube, तुमच्या पैशांवर मोठा सायबर हल्ला होण्याची भीती
सोशल मीडिया अकाऊंट हॅक

नवी दिल्ली : अमेरिकेत सायबर हल्ल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता सर्व सरकारी आणि खासगी कंपन्यांनी त्यांचे नेटवर्क आणखी सुरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी रशियन हॅकर्सनी सायबर घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं. यासंबंधी सोमवारी संध्याकाळी अशीच एक बातमी समोर आली होती. सर्च इंजिन गुगलच्या ईमेल सर्व्हिस आणि जीमेलसह अनेक सेवा खंडित झाल्या आहेत. यामध्ये मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण कंपनीने याबद्दल अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. (hacking cyberattack target us agencies russia to be blamed)

खरंतर, आधीपासून गुगल सायबर हल्ला किंवा हॅकिंगला नकार देत आहे. याआधीही अनेक वेळा गुगलच्या सेवा अशा खंडित झाल्या होत्या. कंपनीने त्याविषयी कोणतीही ठोस माहिती दिली नव्हती. पण सोमवारी अमेरिकेत हॅकिंगच्या घटनांमुळे लोकांनी चिंता व्यक्त केली होती. सध्या आधारपासून बँक खाते आणि पिन-पासवर्डपर्यंत सर्व काही इंटरनेट आणि ईमेलवर उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांनी खासगी माहिती असुरक्षित असल्याचं बोललं जात आहे.

इतकंच नाही तर मोबाइलमध्येही सर्व प्रकारच्या आवश्यक आणि खासगी माहिती सेव्ह केलेली असते. बहुतेक लोक मोबाईलद्वारे ईमेलसुद्धा पाठवतात. अशा परिस्थितीत हॅकिंग आणि सायबर हल्ल्याची बातमी जर समोर आली तर ही मोठी चिंतेची बाब असणार आहे. यामुळे डेटा हॅकिंगच्या प्रकरणात नागरिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं.

खासगी फाईल्सपर्यंत पोहोचले हॅकर्स

यूएस नेटवर्कमध्ये हॅकिंगचा धोका लक्षात घेता यूएस सायबर सिक्युरिटी युनिटने सोमवारी सर्व फेडरल एजन्सींना सॉफ्टवेअर अपडेट काढण्याचे निर्देश दिले. या दिशेने हजारो कंपन्या सध्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. या कंपन्या सुरक्षेवर काम करत असतानाच हॅकर्स गुप्त फाइल्सपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. त्या सायबर घुसखोरीद्वारे गोपनीय माहिती चोरल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेची माजी सायबर सुरक्षा अधिकारी आणि सध्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडीजमधील ज्येष्ठ सल्लागार सुझान स्पॉल्डिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सवर पुन्हा सायबर हल्ला करण्यापेक्षा आपण आपली माहिती सुरक्षित करणं अधिक सोपं आहे. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणांहून यावर काम करत आहोत. सायबर घुसखोरांचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यामुळे तुमच्याही अकाऊंटसोबत काही गैर होण्याआधी संपूर्ण माहिती सुरक्षित करून ठेवा. आपली खासगी माहिती कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करू नका. (hacking cyberattack target us agencies russia to be blamed)

G-Mail आणि YouTube सेवा झाली होती ठप्प

सोमवारी भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद पडली होती. ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले होते. यानंतर तब्बल पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत झाली होती.

नेमकं कारण काय?

यूट्यूब आणि जीमेल ओपन होण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. देशभरात बहुसंख्य युजर्सना ही समस्या येत होती. लोकप्रिय गुगलसह त्यासंबंधी सर्व वेबसाईट आणि सेवा बंद पडल्या. यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल शीटसह अनेक सेवा ठप्प झाल्या. तांत्रिक कारणांमुळे या अडचणी येत होत्या. मात्र, अखेर पाऊण तासांनी या सेवा सुरु झाल्या.

इतर बातम्या –

जवळपास पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत

गुगलमध्ये मोठे बदल होणार, युजर्सना दारु आणि जुगाराशी संबंधित जाहिराती हटवण्याचे अधिकार मिळणार

(hacking cyberattack target us agencies russia to be blamed)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI