जवळपास पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत

भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे (Gmail and YouTube down in India).

जवळपास पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 6:14 PM

मुंबई : भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद पडली. ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले. दरम्यान, पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत झाली  (Gmail and YouTube down in India).

भारतात रविवारी दुपारी अचानक जीमेल आणि यूट्यूब सेवा डाऊन झाली. अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले. प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटरच्या माहितीनुसार गुगल, यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचं समोर आलं. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती समोर आली होती. मात्र, आती ही सेवा पूर्ववत झाली आहे.

नेमकं कारण काय?

यूट्यूब आणि जीमेल ओपन होण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. देशभरात बहुसंख्य युजर्सना ही समस्या येत होती. लोकप्रिय गुगलसह त्यासंबंधी सर्व वेबसाईट आणि सेवा बंद पडल्या. यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल शीटसह अनेक सेवा ठप्प झाल्या. तांत्रिक कारणांमुळे या अडचणी येत होत्या. मात्र, अखेर पाऊण तासांनी या सेवा सुरु झाल्या.

यूट्यूबकडून स्पष्टीकरण

“यूट्यूब वापरताना अनेकांना अडचणी येत असल्याची माहिती आमच्या निदर्शनास आली आहे. आमची टीम सर्व यावर काम करत आहे. सर्व सुरळीत झाल्यावर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देऊ”, असं युट्यूबने ट्विटरवर सांगितलं.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

गुगल, जीमेल, यूट्यूब डाऊन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा अक्षरक्ष: पाऊस पडला. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीतच ट्विटरवर 81 लाखांपेक्षा जास्त ट्विट यूट्यूब डाऊन विषयी झाले. त्याचबरोबर 27 हजारांपेक्षा जास्त ट्विट हे गुगल डाऊन विषयी करण्यात आले. ट्विटरवर तर यूट्यूब आणि गुगल डाऊन हे विषय ट्रेडिंगला आले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.