
नवी दिल्ली | 14 ऑगस्ट 2023 : जगात रहाण्यासाठी योग्य असणाऱ्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. आशिया प्रशांतने जगात राहण्यासाठी योग्य अशा 173 शहरांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत ऑस्ट्रीयाची राजधानी व्हीयन्ना या शहराला रहाण्यासाठी सर्वात योग्य शहर अशी उपाधी मिळाली आहे. तर सिंगापूरचा या यादीत दहावा क्रमांक आला आहे. पाकिस्तानातील कराची शहर या यादीत सर्वात खाली गेले आहे. तर भारतातील तीन शहरे पन्नास शहराच्या आत समाविष्ठ झाली आहेत.
आशिया प्रशांतने शहरांची निवड विविध निकषांवर केली आहे. आशिया प्रशांतच्या यादी एकूण 173 शहरांची निवड केली आहे. त्यात भारताचा विचार करता भारतातील चार शहरांची निवड करण्यात आली आहे. यात बंगळुरु, चेन्नई, नवी दिल्ली आणि मुंबई शहर अशा चार शहरांची निवड झाली आहे. पाकिस्तानाती शहरे या यादी अगदी खाली आहेत.
इकोनॉमिस्टच्या वृत्तानूसार रहाण्यायोग्य शहरात पहिल्या क्रमांक व्हीएन्ना आला आहे. या शहरानंतर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्कचे कोपेनहेगनने आपले स्थान कायम ठेवले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सिडनी यांचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक आला आहे. तसेच प्रमुख दहा शहरात कॅनडातील तीन शहरे सामील झाली आहेत. जपानच्या ओसाकाने दहावे स्थान पटकावले आहे. जगात रहाण्यासाठी योग्य अशा शहराच्या यादीत आरोग्य, शिक्षण, स्थिरता आणि पायाभूत सुविधा तसेच पर्यावरण आदीसह अनेक बाबींचा विचार करण्यात आला आहे.
अहवालानूसार या यादी भारतीय शहरे नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरु एशिया प्रशांत शहरात 45 ते 50 वा क्रमांक मिळविला आहे. रॅकींगमध्ये सर्वात खाली सरकलेल्या दहा शहरात युकेतील तीन शहरे एडीनबर्ग, मॅंनचेस्टर आणि लंडन तसेच अमेरिकेतील लॉस एंजिल्स आणि सॅन डीएगो यांचा समावेश आहे. लंडन एक वर्षांपूर्वी 12 स्थानावर होते ते आता 46 व्या क्रमांकावर तर न्यूयॉर्क 10 स्थानावरुन 69 व्या क्रमांकावर आले आहे.
रहाण्यासाठी सर्वात अयोग्य शहरात सिरीयाची राजधानी दमिश्कचा क्रमांक आहे. गेल्या दहावर्षांपासून त्याने स्थान कायम ठेवले आहे. यात पाकिस्तानच्या कराची शहराचा नंबर 169 वर गेला आहे. तर पापुआ न्यू गिनीचा पोर्ट मोरेस्बी 168 क्रमांकावर तर बांग्लादेशाची राजधानी ढाका 167 क्रमांकावर आहे.