निरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, पुढचा एक महिना तुरुंगातच मुक्काम

लंडन : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी निरव मोदीला लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने दणका दिलाय. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावर पुढील सुनावणी आता 26 एप्रिल रोजी होईल. म्हणजे जवळपास एक महिना पुन्हा एकदा निरव मोदीला तुरुंगात रहावं लागणार आहे. निरव मोदीला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. पुढच्या सुनावणीवेळी निरव मोदीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे …

निरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, पुढचा एक महिना तुरुंगातच मुक्काम

लंडन : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी निरव मोदीला लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने दणका दिलाय. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावर पुढील सुनावणी आता 26 एप्रिल रोजी होईल. म्हणजे जवळपास एक महिना पुन्हा एकदा निरव मोदीला तुरुंगात रहावं लागणार आहे. निरव मोदीला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. पुढच्या सुनावणीवेळी निरव मोदीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सादर केलं जाईल.

भारताच्या वतीने टोबी कॅडमॅन यांनी बाजू मांडली. निरव मोदीला जामीन दिल्यास पुराने नष्ट केले जाण्याची शक्यता आहे. शिवाय त्याने एका व्यक्तीला फोनवरुन धमकीही दिली होती. त्याची सुटका झाल्यास तो पुन्हा पळून जाईल, अशी भीतीही भारताच्या वतीने वकिलांनी कोर्टात व्यक्त केली. ईडीचे अधिकारीही कोर्टात उपस्थित होते.

भारतीय तपास यंत्रणा आता निरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी कामाला लागल्या आहेत. वेस्टमिन्स्टर कोर्टानेही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत जामीन देण्यास नकार दिला. निरव मोदीला एका बँकेतून ताब्यात घेण्यात आलं होतं. लंडनमधील एका बँकेत तो खातं उघडण्यासाठी गेला असता त्याला पोलिसांनी अटक केली. निरव मोदीचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात तो रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसत होता. यानंतर भारतीय तपास यंत्रणा कामाला लागल्या, ज्यामुळे लंडनमधील कोर्टाने अटक वॉरंट जारी केला आणि निरव मोदीला अटक झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *