भारतात हाहाकार! ओमानजवळ भारतीय जहाजावर मोठा हल्ला, 3 दिवसात 3 जहाजे टार्गेटवर, अमेरिकेची..

इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष पेटला आहे. मात्र, याचे परिणाम फक्त दोनच देशांना नाही तर जगाला भोगावे लागत आहेत. त्यामध्येच ओमानजवळ अमेरिकेची दहशत बघायला मिळत आहे. मोठे हल्ले अमेरिकेकडून केले जात आहेत. भारतीय जहाजावर मोठा हल्ला अमेरिकेने केला.

भारतात हाहाकार! ओमानजवळ भारतीय जहाजावर मोठा हल्ला, 3 दिवसात 3 जहाजे टार्गेटवर, अमेरिकेची..
Indian ship Jalveer
| Updated on: Jun 11, 2026 | 1:32 PM

ओमान समुद्रामध्ये अमेरिकेने थयथयाट सुरू केला. इराणसोबत युद्ध सुरू असताना अमेरिकेने जगाचा शेवट करण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. ओमान खाडीजवळ अमेरिकेची दादागिरी इतकी जास्त वाढली आहे की, दिसेल त्या जहाजावर अमेरिकेच्या लष्कराकडून हल्ला केला जात आहे. 24 तासात तब्बल तिसऱ्या जहाजावर मोठा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे अगोदर 24 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर हल्ला करण्यात आला आणि आता थेट भारतीय जहाजाला टार्गेट करत अमेरिकेने मिसाईल हल्ला केला. ओमानच्या शिनास बंदराजवळ हा हल्ला झाला. ज्या भारतीय जहाजावर अमेरिकेने हल्ला केला त्याचे नाव MT जलवीर आहे. या जहाजावरील हल्ल्यानंतर धक्कादायक फोटो पुढे आलीत. त्या फोटोमध्ये जहाजाला मोठी आग लागल्याचे दिसत आहे.

या घटनेनंतर भारतीय अधिकारी ओमान खाडीजवळच्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर सरकारकडून स्थानिक प्रशासनासोबत संपर्क साधण्यात आला. नक्की हा हल्ला का करण्यात आला आणि तिथे नक्की कशी स्थिती आहे, याबाबत फार काही माहिती मिळू शकत नाहीये. या हल्ल्याची माहिती ओमानच्या भारतीय दूतावासाने दिली.

या प्रकरणाची माहिती गोळा केली जात आहे. ओमानच्या समुद्राजवळ एका जहाजावर हल्ला करण्यात आला. त्यात 24 भारतीय नागरिक होते, ज्या जहाजावर हल्ला बुधवारी करण्यात आला. त्याचे नाव सेटेबेलो होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा थेट भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश मॅरीटाईम सिक्योरिटी ग्रुप एम्ब्रे यांच्या रिपोर्टनुसार, इराणी बंदरांना तटबंदी करण्याकरिता अमेरिकेकडून ही पाऊले उचलली जात आहेत.

ओमानच्या समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेचे हल्ले वाढले आहेत. जहाजांना टार्गेट करून पेटवले जात आहे. भारताने हा घटनेचा निषेध केला असून भारताकडून या हल्ल्याविरोधात मोठी पाऊले उचलली जात आहेत. मात्र, मध्य पूर्वेत तणाव कमी व्हायचा सोडून शिगेला पोहोचला आहे. जर स्थिती अशीच राहिली तर जग वेगळ्या मोठ्या संकटात सापडू शकते. हे युद्ध थांबवण्याकरिता मोठा दबाव अमेरिकेवर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us