हाहाकार! मोठा बॉम्बस्फोट, तब्बल 15 पोलिस अधिकारी ठार, सीमेजवळ भागात..

नुकताच एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. पाकिस्तानमध्ये हाहाकाराला सुरूवात झाली. पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बहल्ला झाला. या हल्ल्याबाबत हैराण करणारी माहिती पुढे येत आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकारला धक्का म्हणावा लागेल.

हाहाकार! मोठा बॉम्बस्फोट, तब्बल 15 पोलिस अधिकारी ठार, सीमेजवळ भागात..
Bomb attack
| Updated on: May 10, 2026 | 7:44 AM

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका करत आहे. मात्र, त्यांना मध्यस्थी करण्यात अपयश मिळाले. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचे संबंध तणावात आहेत. सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीमेवर प्रचंड तणाव आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानमध्ये केला. त्यामध्येच आता अजून एक खळबळ उडवणारी बातमी पाकिस्तानमधून येत आहे. शनिवारी पाकिस्तानमधील बन्नू येथे झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याने पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा हादरली आहे. मोठा बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर लगेचच पाकिस्तानी पोलिसांना टार्गेट करत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल 15 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेली अधिक माहिती अशी की, हा हल्ला अफगाण सीमेजवळील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या बन्नू जिल्ह्यात झाला.

या हल्ल्यात थेट पोलिस स्टेशनला टार्गेट करण्यात आले. पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाने भरलेली गाडी पोलिस स्टेशनच्या जवळ उडवण्यात आली. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की, काहीच शिल्लक राहिले नाही. मोठे नुकसान झाले. पोलिस अधिकारी सज्जाद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी 15 पोलिस अधिकारी ड्यूटीवर होते आणि काही कर्मचारी देखील.

कार पहिल्यांदा एका गेटवर आदळली आणि त्यानंतर धमाका झाला. काही सेकंदामध्ये सर्वकाही संपले. हा मोठा स्फोट झाल्यानंतर काही पोलिस कर्मचारी मदतीकरिता पुढे आले. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हेच नाही तर असाही दावा केला जात आहे की, या हल्ल्याकरिता ड्रोन चा देखील वापर करण्यात आला. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की, आजुबाजूच्या घरांचेही मोठे नुकसान झाले.

पाकिस्तानमध्ये झालेला हा मोठा हल्ला म्हणावा लागेल. या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारकडून अधिक माहिती देण्यात आली नाहीये. काही दिवसांपूर्वी अत्यंत मोठा हल्ला पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यात 400 पेक्षा अधिक लोक ठार झाली होती. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानकडून हा हल्ला एका रूग्णालयावर करण्यात आला होता.

Follow Us