जग पुन्हा हादरलं! दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट ड्रोन हल्ला, भारतीयासह या देशातील नागरिक…

इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. थेट हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर झाला. त्यामध्येच आता खळबळ उडवून देणारी माहिती थेट पुढे येताना दिसत आहे.

जग पुन्हा हादरलं! दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट ड्रोन हल्ला, भारतीयासह या देशातील नागरिक...
Dubai Airport
| Updated on: Mar 16, 2026 | 10:59 AM

इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. मोठे हल्ले सातत्याने केले जात आहेत. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळल्याने खळबळ उडाली. इराण आणि अमेरिका युद्धात इराणच्या निशाण्यावर दुबईचे विमानतळ सुरूवातीपासूनच राहिले आहे. इराणच्या विमानतळावर सतत हल्ले केले जात आहेत. या ड्रोन हल्ल्यात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली असून या चार जखमींपैकी एकजण भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय प्रवाशाला ड्रोन हल्ल्यानंतर दुखापत झाली. या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली. आता कुठे विमानसेवा सुरळीत होताना दिसली. त्यामध्येच इराणकडून पुन्हा एकदा दुबई विमानतळाला टार्गेट केल्याचे दिसत आहे. या हल्ल्याने पुन्हा एकदा दुबई विमानतळ चर्चेत आले.

मिळालेली अधिकची माहिती अशी की, इराणकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात एक भारताचा नागरिक जखमी झाला असून बांगलादेशाच्या नागरिकाचाही यामध्ये समावेश आहे. या हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थिती तपासली. जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे. फार गंभीर जखमी कोणीही नसल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्यानंतर बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ड्रोन हल्ल्याचा कोणताही नकारात्मक परिणाम हवाई वाहतुकीवर झालेला नाही. हवाई वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. मात्र, पुन्हा एकदा इराणकडून दुबईचा विमानतळाला टार्गेट करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुबईच्या विविध भागांमध्ये सतत इराणकडून हल्ले केले जात आहेत.

इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या लष्कर तळांना टार्गेट करून हल्ले करण्यात आले. कतार, कुवेत, दुबईमधील अनेक भागात हल्ले झाले. यासोबतच तेल रिफायनरीलाही टार्गेट करण्यात आल्याचे बघायला मिळाले. हे युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पण हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धाचा फटका जगातील जवळपास सर्वच देशांना बसताना दिसत आहे.

Follow Us