South China Sea मध्ये चिनी जहाजांची घुसखोरी, मलेशिया भडकला, मलेशियन राजदुताला चीनमधून परत बोलावलं

| Updated on: Oct 06, 2021 | 2:24 PM

मलेशिया दक्षिण चीन समुद्रातील बर्नियो बेटावर दावा करतो. हे क्षेत्र त्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रात येते. काही काळापूर्वी इथं चिनी जहाजांच्या हालचाली दिसल्या.

South China Sea मध्ये चिनी जहाजांची घुसखोरी, मलेशिया भडकला, मलेशियन राजदुताला चीनमधून परत बोलावलं
दक्षिण चीन समुद्रातील (South China Sea) विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) चिनी जहाजाच्या उपस्थितीमुळे मलेशिया भडकला आहे.
Follow us on

मलेशिया (Malaysia) आणि चीनमध्ये (China) पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अलीकडेच मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनमध्ये तैनात असलेले राजदूत आंग युजीन यांना बोलावले होते. या वर्षी जूननंतर मलेशियाने चीनमधून राजदूताला अशाप्रकारे परत बोलावण्याची ही दुसरी वेळ होती. ( Malaysia summons Chinese envoy over vessels in South China Sea )

दक्षिण चीन समुद्रातील (South China Sea) विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) चिनी जहाजाच्या उपस्थितीमुळे मलेशिया भडकला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्याच्या उद्देशानेच मलेशियाने हे पाऊल उचलले आहे. मलेशिया गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या चीनशी संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, चीनच्या दक्षिणी चीन समुद्रातील हस्तक्षेप मलेशियाला भडकवण्यास कारणीभूत ठरत आहे.

मलेशिया म्हणाला – चीनने कायदा मोडला

मलेशिया दक्षिण चीन समुद्रातील बर्नियो बेटावर दावा करतो. हे क्षेत्र त्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रात येते. काही काळापूर्वी इथं चिनी जहाजांच्या हालचाली दिसल्या. इथल्या सबा आणि सारवाकमध्ये चिनी बोटीसह चिनी जहाजंही पाहायला मिळाली होती.

मलेशियाने दावा केला आहे की, असं करून चीनने 1982 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या समुद्रावरील कायदा मोडला आहे. ताज्या घटनेवर मलेशियाच्या परराष्ट्र खात्याने एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. मात्र, घटनेच्या वेळी किती चिनी जहाजे उपस्थित होती, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

जूनमध्येही परिस्थिती तणावपूर्ण

या वर्षी जूनमध्ये चीन आणि मलेशियामधील परिस्थिती तणावपूर्ण बनली, जेव्हा चीनने मलेशियावर त्याच्या हवाई क्षेत्रामध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला. दरम्यान चीनचे एअरफोर्स वाहतूक विमानं आपल्या सीमेमध्ये आल्यानंतर, त्यांच्यामागे मलेशियन विमान पाठवण्यात आल्याचा दावा मलेशियाने केला होता. या घटनेनंतर चीनला स्पष्टीकरण द्यावे लागलं होतं. चीनने आपलं विमान नियमित प्रशिक्षण घेत असल्याचे म्हटले होतं.

चीनने 16 लढाऊ विमाने पाठवली होती

मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आरोप केला होता की, 16 चीनी लढाऊ विमानं त्यांच्या देशाच्या सीमेत घुसली आहेत. ते म्हणाले होते की, सरकारने चीनकडे तक्रार केली आहे आणि चिनी राजदूतांना याबाबत माहिती दिली गेली आहे. त्यावेळी, चीनी दूतावासाकडून म्हटले गेले की, चीनी हवाई दलाच्या नियमित उड्डाणाचा भाग हा भाग होता. त्यातून कुणालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न नव्हता.