Explainer : एकावर हल्ला झाला तर सर्वांवरचा हल्ला मानला जाणार, तीन मुस्लीम देशांची डिफेन्स डील, पाकिस्तानचाही सहभाग
सौदी, तुर्किए आणि पाकिस्तानची 'मक्का डिफेन्स डील' केवळ कागदोपत्री ठरणार आहे. पाकिस्तानची दिवाळखोर अवस्था आणि भारताच्या सामरिक वर्चस्वाच्या पुढे हा सामंजस्य करार भारतासाठी कोणत्याही स्वरुपाचा धोका निर्माण करणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.

पश्चिम आशियात पाच महिन्यांपासून संघर्ष सुरु असताना तीन मुस्लीम देश एकत्र आले आहेत. त्यातील एक आपला शेजारील पाकिस्तान आहे. सौदी अरब येथील भूमीवर एक उच्च स्तरिय बैठक पार पडली. यात सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक नव्या त्रिपक्षीय संरक्षण कराराला जन्म दिला आहे. ज्याला मक्का जॉइंट डिफेन्स सामंजस्य करार असे नाव देण्यात आले आहे. नाटोच्या ‘कलम 5’ धर्तीवर करार जागतिक पातळीवर सामंजस्य करार यासाठी चर्चेत आहे की कारण या कराराचा मुलमंत्र नाटोच्या चर्चित ‘अनुच्छेद ५’ च्या धर्तीवर रचला गेला आहे. म्हणजे ‘एकावर हल्ला तर सर्वांवर हल्ला’या धर्तीवर हा करार झाला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या कराराचा उद्देश्य सामुहिक सुरक्षेला साकार करण्याचा आहे.ज्या अंतर्गत तिन्ही पैकी कोणत्याही सार्वभौम राष्ट्रावरील सशस्र हल्ला हा तिन्ही राष्ट्रावरील आक्रमण मानले जाईल. ...