AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना पद्म भूषण द्या…भाजपच्या बड्या नेत्याने चोळलं जखमेवर मीठ

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस व विरोधक करत असतानाच, भाजपच्या एका नेत्याने त्यांना पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये शांततापूर्ण निवडणुका आणि मतदार यादी दुरुस्त केल्याबद्दल त्यांची स्तुती करत, त्यांना पद्म भूषण देण्याची मागणी भाजपने केली आहे.

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना पद्म भूषण द्या...भाजपच्या बड्या नेत्याने चोळलं जखमेवर मीठ
Gyanesh KumarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 5:15 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशात वातावरण तापलं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेसने तर आज दिल्लीत जोरदार निदर्शने करून ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपच्या एका बड्या नेत्याने ज्ञानेश कुमार यांचं समर्थन केलं आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी ज्ञानेश कुमार यांना पाठिंबा देत त्यांच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र आणि शांततापूर्ण निवडणूक घेण्यात तसेच व्होटर लिस्ट दुरुस्त करण्यात ज्ञानेश कुमार यांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना या कामाबद्दल कमीत कमी पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पाहिजे, असं समिक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पार्टी राहुल गांधींनी सीरिअसली घेत नाही. त्यामुळे तुम्ही तरी का राहुल गांधींच्या गप्पा मारता. ज्ञानेश कुमार यांचं योगदान मोठं आहे. त्यांना कमीत कमी पद्म भूषण पुरस्कार दिला पाहिजे. इतक्या वर्षानंतर राज्यात शांततेत आणि कोणत्याही दहशतीशिवाय मतदान पार पडलं. यामुळे पश्चिम बंगालची जनता खूश आहे. राज्यात कोणतीही हत्या झाली नाही. निर्भयपणे लोकांना मतदान करता आलं, असं समिक भट्टाचार्य म्हणाले.

पश्चिम बंगाल हे सीमावर्ती राज्य आहे. या ठिकाणी व्होटर लिस्टमधून बांगलादेशी घुसखोरांचं नाव काढण्याचं काम ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात झालं. त्यामुळे पश्चिम बंगालच्या सामान्य जनतेचा आशीर्वाद त्यांना आहे. म्हणूनच ज्ञानेश कुमार यांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं, असं भाजपला वाटतंय, असंही भट्टाचार्य यांनी सांगितलं.

विरोधकांचा हल्ला सुरूच

एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांना धारेवर धरलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. कॉकरोच जनता पार्टीनेही ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिलेला असतानाच भाजपच्या नेत्याने त्यांचं समर्थन केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने ज्ञानेश कुमार यांची पोलखोल केली आहे. निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयाला गेल्या 10 महिन्यात 14 वेळा हरकत घेतली होती. मात्र, तरीही एसआयआरशी संबंधित निर्णय परस्पर घेण्यात आले, असा दावा या वृत्तपत्राने केला आहे. म्हणजेच ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयोगात मनमानी सुरू होती, हे उघड झालं आहे.

काँग्रेससह देशातील सर्वच विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार