
अमेरिकेला 8.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरवले. गेल्या दोन महिन्यात रशिया,जपानसह अमेरिकेत आलेला हा मोठा भूकंप मानण्यात येत आहे. दक्षिण अमेरिकेतील ड्रॅक पॅसेजमध्ये भूकंपाचे केंद्र आढळले. हा भाग दक्षिण-पूर्व प्रशांत महासागरासह दक्षिण-पश्चिम अटलांटिक महासागरांना जोडतो. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञांनी पॅसिफिक महासागरात मेगा त्सुनामी आणि महाभूकंपाचा येण्याचा इशारा दिला होता, हे विशेष.
पॅसिफिक कोस्टमध्ये महाभूकंप- त्सुनामीचा इशारा
अमेरिकेतील पॅसिफिक कोस्टमध्ये मेगा त्सुनामी आणि महाभूकंपचा शास्त्रज्ञांनी अगोदरच इशारा दिला होता. कस्केडिया सबडक्शन झोनमध्ये (CSZ) जोरदार भूकंपाचे धक्के बसतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हे झोन उत्तर कॅलिफोर्निया ते व्हँकुव्हर बेटपासून 600 मैलावर आहे. या पट्ट्यातील फुका प्लेट या उत्तरी अमेरिकन प्लेटवर आदळत असल्याने भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भूवैज्ञानिक टीना दुरा यांनी दोन दिवसांपूर्वीच सागरी किनार पट्ट्यात 8.0 तीव्रतेचा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली होती.
कस्केडिया सबडक्शन झोन(CSZ) हा उत्तर अमेरिकेतील सर्वात धोकादायक भाग असल्याचे मानले जाते. व्हर्जिनिया तंत्रज्ञान संशोधन चमू येथील नैसर्गिक घडामोडींवर कायम लक्ष ठेवून असतो. फुका प्लेट आणि उत्तरी अमेरिकन प्लेट यांच्यातील घर्षणामुळे या भागात दबाव तयार होत असून त्यातून भूकंपाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार या संपूर्ण पट्टयात 1 हजार फुटाच्या महाकाय समुद्र लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा फटका कॅलिफोर्निया प्रांतातील समुद्र किनाऱ्यावरील वसाहतींना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Pacific Ring of Fire
Pacific Ring of Fire मध्ये मोठा भाग येतो. या ठिकाणी 30 जुलै रोजी 8.0 तीव्रतेचा भूकंप आला होता. रशियाच्या कामचटका या द्वीपसमुहात हा भूंकप आला होता. हा भाग जपानच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे या भागात त्सुनामी येण्याची भविष्यवाणी करण्यात येते. जुलै आणि ऑगस्टमध्ये अशी त्सुनामी येण्याचा सारखा इशारा देण्यात येत आहे. 2011 मध्ये जेव्हा त्सुनामी आली होती. त्यानंतर भारताच्या दक्षिण किनारपट्टीला सुद्धा त्सुनामीचा फटका बसला होता.