
Donald Trump And Vladimir Putin : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोन सर्वोच्च नेत्यांत अलास्का येथे बैठक झाली. या बैठकीत रशिया-युक्रेनमधील युद्धावर तोडगा काढण्यावर चर्चा झाली. साधारण तीन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, ट्रम्प आणि पुतिन यांच्यात ही बैठक झालेली असली तरी चर्चा मात्र मेलानिया ट्रम्प यांची होत आहे. त्यांनी पुतिन यांना एक सिक्रेट पत्र लिहिले आहे. या पत्रात नेमकं काय होतं? हे आता समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अलास्का येथे झालेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना एक चिठ्ठी सोपवली आहे. या पत्राला ‘शांतीपत्र’ म्हटले जात आहे. ट्रम्प यांची पत्नी मलेनिया ट्रम्प यांनी पुतिन यांना हे शांतीपत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी युक्रेनमधील लहान मुलांबद्दल हळहळ व्यक्त केली असून आता लहान मुलं आणि आगामी पिढीचं रक्षण करण्याची वेळ आली आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच लहान मुलांच्या भवितव्याचा विचार करता रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध थांबवावे अशी विनंतही मलेनिया यांनी पुतिन यांना आपल्या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
मलेनिया यांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात युक्रेनमधील मुलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘प्रत्येक लहान मुलाच्या मनात एक स्वप्न असतं. एक पालक म्हणून आपल्याला या लहान मुलांच्या स्वप्नांना साकार करावे लागेल. आपल्याला एक सन्मानजनक जग तयार करावं लागेल. या जगात प्रत्येकजण शांतीत राहील आणि त्याचे भविष्य सुरक्षित राहील याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल,’ असे मलेनिया ट्रम्प यांनी आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
या जगात काही मुलं ही अंधारातही हसत आहेत. मात्र तुम्ही त्यांचा आनंद त्यांना परत देऊ शकता. या मुलांमधली निरागसता वाचवून तुम्ही फक्त रशियाचीच नव्हे तर पूर्ण मानवतेची सेवा करत आहात. तुम्ही हा विचार तुमच्या पेनाने लागू कर शकता, आता वेळ आलेली आहे, असे मलेनिया ट्रम्प यांनी आपल्या पत्रात म्हटलेले आहे. त्यामुळे आता पुतिन या पत्राची दखल घेणार का? पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्याचा निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.