इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता थेट…

अमेरिका आणि इराणमधील युद्ध पेटले आहे. अमेरिका इस्त्रायल मिळून मोठे हल्ले इराणवर करत आहे. इराणनेही अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या देशांवर थेट हल्ला केला. या युद्धात इराणला नक्कीच अत्यंत मोठा धक्का बसला. मात्र, इराणने अजून हार मानली नाहीये.

इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता थेट...
Supreme Leader Ayatollah Ali Khamenei
| Updated on: Mar 01, 2026 | 9:43 AM

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना त्यांच्या कुटुंबासह ठार मारण्यात आले. अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य वाचू शकला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इराणकडून इस्त्रायलवरही मोठी हल्ले केली जात आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणच्या जनतेमध्ये मोठा संताप बघायला मिळतोय. आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार मारण्यात आल्याने इराणच्या प्रमुख शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात घोषणाबाजी केली. चीन आणि रशियाकडून अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार मारण्यात आल्यानंतर आता इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणाकरण्यात आली. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती या हल्ल्यातून वाचू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आयातुल्ला अली खामेनेई यांना हल्ल्यात ठार मारण्यात आल्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराणची सर्व जबाबदारी आता मोजतबा खामेनी यांच्यावर असणार आहे. खामेनेई यांच्या निधनानंतर तेहरानमध्ये लोक रस्त्यावर उतरले असून त्यांच्याकडून निर्देशन केली जात आहेत.

आयातुल्ला अली खामेनेई यांच्या ठार मारण्यात आल्याने लोकांमध्ये मोठे संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये 7 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. 40 दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला. या युद्धाचा फटका जगाला बसणार असल्याचे दिसत आहे. इराणने आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर हल्ले अधिक तीव्र केली आहेत.

आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मुलाचाही हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचा दावा इस्त्रायलकडून करण्यात आला. इराणी मिसाईलचे अनेक देशात तांडव बघायला मिळतंय. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर इराण अमेरिका आणि इस्त्रायलसोबत बदल नक्की कसा घेतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शेवटपर्यंत आयातुल्ला अली खामेनेई यांना इराणची सत्ता सोडण्यासाठी अमेरिकेकडून धमकावले जात होते.

Follow Us