बांगलादेश औकातीवर! मोहम्मद युनूस यांचा VIDEO व्हायरल, भारताविषयी वादग्रस्त विधान

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या चीन दौऱ्यादरम्यान बीजिंगला एक प्रस्ताव दिला होता, ज्यात आश्चर्यकारकरित्या भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांचा समावेश होता. दरम्यान, मोहम्मद युनूस नेमके काय म्हणाले? याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

बांगलादेश औकातीवर! मोहम्मद युनूस यांचा VIDEO व्हायरल, भारताविषयी वादग्रस्त विधान
Muhammad Yunus
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2025 | 1:35 PM

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचा बंगालच्या उपसागराचा संरक्षक भारत नसून आपला देश बांगलादेश आहे, असे सांगतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ पोस्ट करत भाजपप्रणित केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भारताला घेरण्यासाठी बांगलादेशने चीनला दिलेले निमंत्रण ईशान्य प्रदेशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मणिपूरसह संपूर्ण प्रदेशाची काळजी सरकार घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली की, “बांगलादेश चीनला भारताला घेरण्याचे आमंत्रण देत आहे. बांगलादेश सरकारची ही वृत्ती आपल्या ईशान्य भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे. सरकार मणिपूरची काळजी घेत नाही आणि चीनने अरुणाचलमध्ये एक गाव वसवले आहे.

खेरा म्हणाले की, आमचे परराष्ट्र धोरण इतके दयनीय अवस्थेत आहे की, ज्या देशात भारताने मोठी भूमिका बजावली तो देशही आज आपल्याविरोधात संघटित होण्यात गुंतला आहे.

युनूस यांनी चीनमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, भारताच्या पूर्व भागात सेव्हन सिस्टर्स नावाची सात भूपरिवेष्ठित राज्ये आहेत. सात राज्यांना समुद्रात जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. आम्ही समुद्राचे (बंगालच्या उपसागराचे) रखवालदार आहोत,’ असे सांगून युनूस यांनी चीनला त्याद्वारे जगभरात माल पाठविण्याचे आमंत्रण दिले. गेल्या आठवड्यात ते चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती.

मोहम्मद युनूस यांचा व्हिडिओ पाहा

संरक्षण तज्ज्ञांचे मतही वाचामोहम्मद युनूस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण तज्ज्ञ प्रफुल्ल बक्षी म्हणतात की, आम्ही बांगलादेशची निर्मिती केली. बांगलादेशची निर्मिती करताना आम्ही नकाशाचा कोणताही फायदा घेतला नाही. बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान अलीकडे ‘चिकन नेक’ (सिलिगुडी कॉरिडॉर) बद्दल बोलत आहेत आणि भारताचा गळा दाबण्याची आणि त्याचा गैरफायदा घेण्याची भाषा करत आहेत. आता बांगलादेश म्हणत आहे की, चीनने मदत करावी आणि सिलिगुडी कॉरिडॉरवर अवलंबून असलेल्या 7 भूपरिवेष्ठित भारतीय राज्यांमध्ये प्रवेश करावा. बांगलादेशच्या दुसऱ्या या बाजूनेही आपण हेच करू शकतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

 

“आम्ही त्यांना समुद्राच्या पलीकडे गळा दाबू शकतो. युनूस विचार करत आहेत की ते चीनला सात राज्यांसाठी समस्या निर्माण करण्यात सामील करतील, जे ते आधीच करत आहेत. केवळ चीनच नाही तर इतरही अनेक एजन्सी ईशान्य भारतात काम करत आहेत. भारत सरकार प्रसारमाध्यमांमध्ये जाऊन याबाबत आवाज उठवणार नाही. सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारत काय करणार आहे, हेही युनूस यांना ठाऊक आहे.

 

युनूस भारताच्या मागे का आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट करत युनूस यांनी भारताच्या ईशान्य भागाचा उल्लेख का केला, असा सवाल केला.