Nepal: चिखलात शोधायचं की पुराच्या पाण्यात? सोनं, चांदी आणि नोटांनी भरलेल्या 20 बँकांच्या तिजोऱ्या गेल्या कुठे? नेपाळी पोलिसांना आलं टेन्शन

नेपाळमधील महापुरानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, आता पोलिसांसमोर बँकांच्या २० हून अधिक तिजोऱ्या शोधण्याचे आव्हान आहे. पुरात वाहून गेलेल्या या तिजोऱ्यांमध्ये रोख रक्कम आणि कोट्यवधी रुपयांचे सोनं होते. पोलिसांनी काही तिजोऱ्या सुरक्षित केल्या आहेत.

Nepal: चिखलात शोधायचं की पुराच्या पाण्यात? सोनं, चांदी आणि नोटांनी भरलेल्या 20 बँकांच्या तिजोऱ्या गेल्या कुठे? नेपाळी पोलिसांना आलं टेन्शन
| Updated on: Sep 01, 2026 | 5:35 PM

नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे अख्ख्या देशाला मोठा फटका बसला. घर वाहून गेली, इमारती , रस्ते खराब झाले, अनेक लोकं बेपत्ता झाली. त्या नागरिकांना शोधून काढण्याचं काम अजूनही सुरू आहे. या महापुरामुळे आत्तापर्यंत जवळपास 1000 लोकांनी जीव गमावल्याची माहिती समोर आली असून त्याहून अधिक कित्येक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असतानाच आता नेपाळच्या पोलिसांपुढे आणखी एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे या पुरात वाहून गेलेल्या (बँकांच्या) 20 हून अधिक तिजोऱ्या शोधण्याचं.. काही तिजोऱ्या पाण्यामुळे दूरपर्यंत वाहून गेल्या तर काही या चिखल-गाळात खाली रुतल्यात, अडकून पडल्यात. अशा परिस्थितीमध्ये या तिजोऱ्या शोधून काढणं आणि त्या सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी आणखी जोर लावून मेहनत करावी लागत आहे.

हरवलेल्या या तिजोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही आहेत, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या तिजोऱ्या लुटारूंच्या हाथी लागल्या तर काय याचीही वाढती चिंता आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, हे वॉल्ट अथवा तिजोरी, रासुवा, धाडिंग आणि चितवनसह पूरप्रभावित भागातील बँकांच्या होत्या. पुरात वाहुन गेलेले , बेपत्ता झालेले नागिरक शोधून काढणं ही पोलिसांची प्राथमिकता आहेच. पण पूरप्रवण क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था राखणं आणि मौल्यवान सामान सुरक्षित ठेलणं हेही महत्वाचं काम आहे, असं DIG अबी नारायण काफ्ले म्हणाले.

20 हून अधिक बँकांच्या तिजोऱ्या गेल्या वाहून

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी सांगितलं की, रसुवा, धादिंग, चितवन आणि इतर ठिकाणी अनेक बँकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यापैकी अनेक तिजोऱ्या, ज्यामध्ये रोख रक्कम आणि सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू होत्या, एकतर पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत किंवा मोठ्या प्रमाणात गाळाखाली दबल्या आहेत. आमचे जवान आता या तिजोऱ्या शोधून त्या सुरक्षित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या तिजोऱ्या फोडून लोकांनी त्यातील रोख रक्कम चोरल्याच्या घटनाही घडल्या आहेत, असंही काफ्ले यांनी नमूद केलं.

29 लोकांना केली अटक

दरम्यान, बँकांच्या तिजोऱ्या फोडून पैसे चोरल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 29 जणांना अटक केली आहे. ही कारवाई धादिंग जिल्ह्यात करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपर रसुवा परिसरातून वाहून आलेल्या एका बँकेच्या तिजोरीतून 92 लाख नेपाळी रुपये (NPR) चोरीला गेले होते. पोलिसांना काही बेपत्ता तिजोऱ्या शोधून त्या सुरक्षित करण्यातही यश आलं. रविवारी संध्याकाळी जवानांनी त्रिशूली येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट बँकेच्या धुंगे शाखेची एक तिजोरी शोधून काढली.

तिजोरीतून 1.5 कोटी रुपये आणि 50 कोटी रुपयांचे सोनं जप्त

‘रविवारी संध्याकाळी आमच्या जवानांना त्रिशूली येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट बँकेच्या धुंगे शाखेची एक तिजोरी सुरक्षित करण्यात यश आले. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळपास आठ तास लागले’ असं डीआयजी अबी नारायण काफ्ले यांनी सांगितलं . पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सापडलेल्या तिजोरीमध्ये 1.5 कोटी नेपाळी रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. त्यामध्ये सुमारे 50 कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोनेही असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान एका वेगळ्या मोहिमेत पोलिसांनी नुवाकोट येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट बँकेची आणखी एक तिजोरीही सुरक्षित केली. आता अधिकारी इतर तिजोऱ्यांचा शोध घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us