AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत मिठाचा खडा? भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याचे संकेत, KDMC मध्ये काय घडतंय?

KDMC Mahayuti : मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याने भाजप आणि मनसेत वादाची ठिणगी पडली आहे. याचा परिणाम आता कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणावर पहायला मिळत आहे.

महायुतीत मिठाचा खडा? भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याचे संकेत, KDMC मध्ये काय घडतंय?
Mahayuti KDMC Alliance NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 01, 2026 | 5:57 PM
Share

मनसे आणि भाजपमधील वाढत्या राजकीय वादाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) महायुतीच्या सत्तासमीकरणावर उमटताना दिसत आहेत. मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली असून, यामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महायुतीतून मनसेला बाहेर काढण्याची मागणी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीमध्ये मनसेचा समावेश आहे. मात्र, मनसे नेत्यांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यांवरून भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो हटवल्याच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने मनसेसोबत सत्तेत बसण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे. नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. मनसेसोबत सत्तेत बसणार नाही, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे.

महायुती टिकवायची असेल तर…

महायुती टिकवायची असेल तर मनसेला तातडीने युतीतून बाहेर काढावे, अशी मागणी भाजपने शिवसेनेकडे केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र लिहिले आहे. मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी या पत्रातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विरोधी पक्षात बसण्याची भाजपची भूमिका

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील गटनेता कार्यालयात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसेसोबतची युती तोडली नाही, तर विरोधी पक्षात बसण्याची भूमिका भाजपकडून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे KDMC मधील महायुतीच्या सत्तासमीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मनसेसोबतची युती कायम ठेवायची की भाजपच्या मागणीनुसार मनसेला महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवायचा, याचा निर्णय आता शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.

अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवला

मनसेचे नेते अमित ठाकरे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांची त्यांनी पाहणी केली. या कॉलेजमध्ये गेल्यावर अमित ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नसण्यावरून कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी एका विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो काढण्यास सांगितला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्याने तातडीने पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला होता. त्यामुळे आता राज्यभरात भाजपने मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच परिणाम कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकारणावर होत असल्याचे पहायला मिळत आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट