AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Protest : नेपाळमध्ये असं कधीच घडलं नव्हतं… तुरुंगाच्या भिंती तोडून कैदी पळाले, देशातून पळ काढण्यासाठी नेते विमानतळावर… नुसतं अराजक

सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी देश, जनता, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षांनी सहकार्य करण्याची गरज आहे असे राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटले आहे.

Nepal Protest : नेपाळमध्ये असं कधीच घडलं नव्हतं... तुरुंगाच्या भिंती तोडून कैदी पळाले, देशातून पळ काढण्यासाठी नेते विमानतळावर... नुसतं अराजक
NEPAL PROTEST
| Updated on: Sep 09, 2025 | 9:23 PM
Share

Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीनंतर संतप्त झालेल्या तरुणांच्या झुंडीने संसदचे पेटवून दिल्याने अनेक नेते परांगदा झाले आहेत. नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक आणि कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांच्या सह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली आणि राष्ट्रपती  रामचंद्र पौडेल यांनी राजीनामा दिलेला आहे. नेपाळचे अनेक मंत्री लष्कराच्या हेलीकॉप्टरने कांठमांडू सोडून पळाले आहेत. निदर्शकांनी अनेक मंत्र्यांसह राष्ट्रपतीचे निवासस्थान जाळून टाकले आहे. कर्फ्युनंतरही नेपाळच्या स्थितीवर कोणताही परिणाम झालेला नाही. काल झालेल्या आंदोलनात १९ जणांचा मृत्यू झाला होता. आज महोत्तरी येथील जलेश्वर जेलची भिंत पाडल्याने त्यातील एकूण 572 कैदी फरार झाले आहेत.

नेपाळमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही परिस्थितीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. निदर्शकांनी अर्थमंत्र्यांवर हल्ले करत त्यांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण केली आहे. नेपाळची राजधानी काठमांडू,ललितपूर आणि भक्तापूर येथे संचारबंदी लागू केली आहे. तरीही निदर्शकांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांच्या पार्टी ऑफीसला आग लावली आणि अनेक जागी तोडफोड केली आहे. रस्त्यांवर तरुणांचे तांडेच्या तांडे फिरत आहेत. रस्ते तरुणांनी भरले आहेत. पार्लमेंट इमारतीजवळ देखील त्यांची निदर्शने सुरु आहेत. सोशल मीडियाच्या बंदीनंतर हे आंदोलन सुरु झाले आहे.

निदर्शकांनी तुरुंगाची भिंत तोडली, 572 कैदी फरार

निदर्शकांनी महोत्तरी येथील जलेश्वर तुरुंगाची भिंत तोडल्याने आतील 572 कैदी फरार झाले आहेत. काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार पोलिस अधिक्षक हेरंब शर्मा यांनी सांगितले की ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. जेव्हा लाठ्याकाठ्या घेऊन 500 हुन अधिक निदर्शकांनी कैद्यांसह हा प्रकार केला. येथील परिस्थिती पाहून पोलिस काहीही करु शकत नव्हती. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी 6:40 वाजल्यापासून जलेश्वर येथेही कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला.

नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सर्व पक्षांना सयंम पाळण्याचा आणि संकटावर उत्तर शोधण्याची चर्चा करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांनी राजीनामा दिला आहे.पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे. आरएसपी प्रमुख रबी लामिछाने यांनी नागरिकांना देशाच्या संपत्तीचे संरक्षण करण्याची आग्रह केला आहे. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, पोलीस, सुरक्षा एजन्सी आणि न्यायालयाच्या संबंधित दस्तावेज महत्वपूर्ण राष्ट्रीय संपत्ती आहे. याच्या संरक्षणात ढीलाई झाली तर ही संवेदनशील सामुग्री नष्ट होईल आणि त्यामुळे राष्ट्राला मोठे नुकसान होऊ शकते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...