AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Gen Z Protest : 36 वर्षांचा तरुण बनला नेपाळी युवकांच्या गळ्यातला ताईत, तरुणांचे आंदोलन चेतवणारा नवा मसीहा

नेपाळ सरकारने सोशल मीडिया वरील बंदी लागलीच मागे घेतली. परंतू रस्त्यांवरीर तरुणांचे संतप्त निदर्शने आजही सुरुच आहेत. अनेक राजीनामे झाले, जाळपोळ झाली. त्याला एक ३६ वर्षांचा तरुण जबाबदार ठरला आहे. कोण आहे हा तरुण

Nepal Gen Z Protest : 36 वर्षांचा तरुण बनला नेपाळी युवकांच्या गळ्यातला ताईत, तरुणांचे आंदोलन चेतवणारा नवा मसीहा
सुदन गुरुंग
| Updated on: Sep 09, 2025 | 9:22 PM
Share

नेपाळमध्ये तरुणांच्या यल्गाराने संसदच काय तर नेत्यांनाही पळता भुई थोडी झाली आहे. सोशल मीडियावरील बंदी हे तर केवळ निमित्त ठरले आहे. बऱ्याच काळापासून तरुणांच्या मनात कोंडलेली वाफ या निमित्ताने उसळून बाहेर आल्याचे म्हटले जात आहे भ्रष्टाचार, घराणेशाही आणि कोसळलेली अर्थव्यवस्था यांनी परिस्थितीला आणखीनच विस्फोटक बनवले असल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावरील बंदी यात आगीत तेल घालण्याचे काम केले आणि पहाता पहाता हे आंदोलन पेटले. सरकारने वाढता विरोध पाहून सोशल मीडियावर बंदी तातडीने मागे घेतली. अनेकांनी राजीनामे दिले.जाळपोळीच्या घटना घडल्या.या युवकांच्या गर्दीला एकटवण्याचे काम केले ते हामी नेपाल नावाच्या संघटनेने. आणि या संघटनेचे कर्तेधर्ते आहे, ३६ वर्षांचा एक तरुण सुदन गुरुंग. गुरुंग आज नेपाळच्या जनरेशन z साठी एक उमेदीचा नवा किरण आणि नवे प्रतीक मानला जात आहे.

विद्यार्थ्यांचा नवा मसिहा गुरुंग

गुरुंग यांची ताकद आहे विद्यार्थी आणि तरुण. त्यांचं आंदोलन संपूर्णपणे डिजिटल टुल्सवर आधारित आहे.इंस्टाग्राम, डिस्कॉर्ड आणि युट्युबवर ते केवळ प्रोटेस्टचे रुट्स नव्हे तर सुरक्षेचे उपाय देखील शेअर करतात. त्यांनी तरुणांना अपिल केले की निदर्शनात त्यांना युनिफॉर्म आणि पुस्तके घेऊन सामील व्हावे. आंदोलनाचा हा प्रकार नेपाळी तरुणांना खूपच भावला आणि आंदोलन पहाता पहाता पेटले.

इव्हेंट ऑर्गनायझर ते एक्टीव्हीस्टपर्यंत

एके काळी इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या सुदन यांनी त्यांच्या करीयरची दिशा संपूर्णपणे बदलली. भूकंपात त्यांनी मदत साहित्य पोहचवण्यापासून ते पुर, भुस्खलन आणि साथीच्या सारख्या नैसर्गिक संकटात काम केले. हामी नेपाळ यांनी आतापर्यंत हजारो कुटुंबांना जेवण, कपडे आणि औषधे पोहचवली आहेत. त्यांचा मंत्र आहे – For the People, By the People. जेव्हा निदर्शक हिंसक झाले, २० लोक मृत्यूमुखी पावले आणि शेकडो जखमी झाले.तेव्हा कुठे कॅबिनेटने ही बंदी मागे घेतली. म्हणजे सुदन गुरुंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिस्टीमला त्यांच्या पुढे झुकण्यास मजबूर केले.

आधीही केलीत आंदोलनं

केवळ विरोध नाही तर सुदन गुरुंग यांनी आधी जनआंदोलनांना दिला दिली आहे. धरानमधील घोपा कँप प्रोटेस्टपासून आरोग्य सेवेत पारदर्शकतेची मागणी, ते नेहमीच सक्रीय राहिले आहेत. त्यांचा हा ट्रॅक रेकॉर्ड त्यांना आज नेपाळच्या तरुणांमध्ये विश्वसनीय चेहरा बनवले आहे.आज सुदन गुरुंग केवळ एक NGO प्रमुख नव्हे तर नेपाळच्या जनरेशन Z ची आवाज बनले आहेत.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.