निवडणूक प्रचारात अधिकची रक्कम खर्च, फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना थेट 1 वर्षांची कोठडी, पॅरिस कोर्टाच्या निर्णयाने सार्कोझी गजाआड

| Updated on: Sep 30, 2021 | 5:45 PM

Nicolas Sarkozy: पॅरिस कोर्टाने फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना 1 वर्षांसाठी घरात नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

निवडणूक प्रचारात अधिकची रक्कम खर्च, फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना थेट 1 वर्षांची कोठडी, पॅरिस कोर्टाच्या निर्णयाने सार्कोझी गजाआड
निवडणुकीत ठरवून दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खर्च करणं निकोलस सार्कोझी यांच्या अंगाशी आलं
Follow us on

पॅरिस: आपल्याकडे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम निवडणुकीत खर्च केली तर काय होऊ शकतं? निवडणूक आयोगापुढे हे सिद्ध केल्यानंतरही आपल्याकडे एकतर उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते, किंवा निवडणूक आयोगाकडून काही वर्षांसाठी निवडणूक लढण्यावर बंदी घातली जाऊ शकते. मात्र, फ्रान्समध्ये याच आरोपाखाली (Illegal campaign financing)चक्क माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी (Nicolas Sarkozy) यांना कोर्टाने (Paris court) 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2012 मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, या निवडणुकीत त्यांनी ठरवून दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खर्च केली आणि हीच गोष्ट आता सार्कोझींच्या अंगाशी आली आहे. ( nicolas-sarkozy-france-court-sentences-nicolas-sarkozy-to-one-year-in-prison-in-campaign-financing-case-election fraud )

नक्की काय आहे हे प्रकरण?

सार्कोझी हे 2007 ते 2012 पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यानंतर 2012 ला पुन्हा फ्रान्समध्ये निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत त्यांचा समाजवादी पक्षाचे नेते फ्रँकोइस ओलांद (Francois Hollande) यांनी पराभव केला. मात्र, ही निवडणूक लढवण्यासाठी 27.5 दशलक्ष डॉलरपर्यंत ही कायदेशीर रक्कम खर्च करण्याची परवानगी होती. असं असतानाही सार्कोझी यांनी याच्या दुप्पट रक्क खर्च केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांनंतर हे प्रकरण कोर्टात गेलं, जिथं त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने म्हटलं की, ‘सार्कोझी यांना निवडणूक खर्चाची मर्यादा माहित होती, मात्र तरीही जाणीवपूर्वक सार्कोझीने अतिरिक्त खर्च सुरुच ठेवले’ दरम्यान, याआधी अनेकदा सार्कोझी यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत.

लेखापालांच्या इशाऱ्यानंतरही खर्च सुरुच ठेवला

सरकारी वकीलांना या प्रकरणात सांगितलं की, 2012 च्या निवडणुकीतील खर्च मर्यादा सार्कोझी यांना माहिती होती. त्यांना माहित होतं की आता कमाल मर्यादा गाठली आहे. फ्रेंच कायद्यानुसार, ती मर्यादा ओलांडल्यास गुन्हा ठरतो हेही सर्कोझींना माहित होतं. हेच नाही तर त्यांच्या 2 लेखापालांनी त्यांना वारंवार या गोष्टीची जाणीवही करुन दिली, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सार्कोझींनी या निवडणुकीत अनेक मोठ्या रॅली काढल्या, सभा घेतल्या आणि त्यावरच हा अपाम पैसा खर्च झाल्याचं वकीलांनी सांगितलं.

सार्कोझींनी सर्व आरोप फेटाळले

सार्कोझींनी न्यायालयाला सांगितलं की, ‘अतिरिक्त पैसा हा निवडणुकीत वापरण्यात आला नाही, तर तो गरीबांच्या भल्यासाठी वापरला गेला. त्यातून कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. शिवाय हे करताना आपण जास्त लक्ष घातलं नाही कारण हे करण्यासाठी एक टीम होती. त्यामुळे खर्चाच्या रकमेचा दोष माझ्यावर येत नाही.’ दरम्यान या प्रकरणात सार्कोझींसह 13 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सदस्य, लेखापाल आणि रॅली आयोजकांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात फसवणूक करणे, बेकायदेशीर निधी खर्च करणे यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सार्कोझीला इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग ब्रेसलेटसह घरी पाठवलं

सर्कोझीला 1 वर्षांची शिक्षा झाली असली तरी सार्कोझी वरच्या न्यायालयात याविरोधात अपील करु शकतात. दरम्यान, सार्कोझी यांची तुर्तास रवानगी जेलमध्ये न करता, कोर्टाने 1 वर्ष त्यांना नजरबंद ठेवण्यास सांगितलं आहे, सध्या त्यांना घरी पाठवलं आहे, मात्र, घरी पाठवताना त्यांच्या हातात इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग ब्रेसलेट घालण्यात आलं. या ब्रेसलेटद्वारे सार्कोझी कुठं आहे, ते कुणा कुणाला भेटतात यासह अन्य माहिती पोलिसांना मिळते. त्यामुळे ते देश सोडून जाऊ शकत नाही आणि त्यांना कोर्टाच्या तारखेला हजर राहावं लागतं.

हेही वाचा:

Europe energy crisis: युरोपातील उर्जासंकट जगाची डोकेदुखी वाढवणार, जगभरात महागाईचा भडका उडण्याची शक्यता

इस्रायलच्या डझनभर लोकांकडून पॅलेस्टाईनच्या गावावर हल्ला, इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव पुन्हा वाढला