AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल

Serena Hotel हॉटेल पाकिस्तानच्या प्रमुख लक्झरी फाईव्ह स्टार हॉटेल पैकी एक आहे. या हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा आणि हायप्रोफाईल बैठका होत असल्याने ते प्रसिद्धीत असते.

पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
Serena Hotel
| Updated on: Apr 11, 2026 | 7:08 PM
Share

Serena Hotel Fare: मध्य पूर्वेत इराण युद्धाने दीर्घकाळ तणाव सुरु असताना अमेरिका आणि इराणच्या दरम्यान शांतता बैठक सुरु आहे.या महत्वपूर्ण बैठकीसाठी पाकिस्तानची राजधानीतील एका लक्झरी हॉटेलची निवड केली आहे. हे हॉटेल केवल व्हिआयपी पाहुण्यांच्या पाहुणचाराची जागा नसून हाय प्रोफाईल मिटींगसाठी ओळखले जाते. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. ज्या हॉटेलात दोन्ही देशांचे शिष्ठमंडळ उतरले आहे.तेथील एक रात्रीचे भाडे किती आहे. आणि पाहुण्यांना कोणत्या सुविधा मिळतात. चला तर पाहूयात काय सुविधा येथे आहेत.

अमेरिका आणि इराणच्या शिष्ठमंडळात होणाऱ्या चर्चेसाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील प्रसिद्ध सेरेना हॉटेलची निवड करण्यात आली आहे. हे हॉटेल देशातील प्रमुख लक्झरी ५ – स्टार हॉटेलपैकी एक आहे. दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय बैठका आणि हायप्रोफाईल पाहुण्यांचे स्वागत आणि ऊठबस करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

सेरेना हॉटेलची सुरुवात ११ मार्च २००२ मध्ये झाली होती. याचे उद्घाटन त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली होती. या हॉटेलचा मालकी हक्क आगा खान फंड फॉर इकोनॉमिक डेव्हलपमेंटजवळ आहे. तर या हॉटेलचे संचलन त्याची सहायक कंपनी टुरिझ्म प्रमोशन सर्व्हीस द्वारे केले जाते.

Serena Hotel चे भाडे किती ?

जर भाड्याचा विचार कराल तर बातमीनुसार सेरेना हॉटेलच्या डिलस्क रुमची किंमत सुमारे १४३ डॉलर म्हणजे सुमारे १३ हजार रुपयांनी सुरु होते. जी अनेकदा १५० ते २०० डॉलरपर्यंत पोहचते. तर एक्झुकेटिव्ह रुमचे भाडे २०० ते २५० डॉलर म्हणजे सुमारे २३ हजार रुपयांपर्यंत असते. सर्वात महागड्या प्रेसिडेन्शियल सुईटचे भाडे सुमारे १००० डॉलर म्हणजे जवळपास ९३ हजार रुपये प्रति रात्र पर्यंत जाते. या हॉटेलचे डिझाईन प्रसिद्ध आर्किटेक्ट नय्यर अली दादा यांनी केले आहे. ज्यात पारंपारिक पाकिस्तानी कलेसोबत मुगल आणि मुरिश शैलीची झलक पाहायला मिळते. ग्रीन मार्बल, लाकडाचे छत आणि खास प्रकारच्या फॅब्रिकच्या सजावटीने हे हॉटेल राजेशाही दिसते.

होटल बांधायला २७० कोटी रुपये खर्च

सुमारे २७० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे हॉटेल १४ एकरवर पसरलेल्या एका सुंदर बगिच्यात आहे. शहराच्या मधोमध असल्याने आजूबाजूला मार्गल्ला हिल्स आणि राव सरोवर अशी आकर्षक ठिकाणे आहेत. या हॉटेलच्या अनेक रुममधून डोंगराचे नयनरम्य दर्शन होते. त्यामुळे हे हॉटेल आणखीन सुंदर वाटते.

Follow Us
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप