‘कोरोनाची लसचं नव्या व्हेरियंट्सना कारणीभूत’, नोबेल विजेत्या फ्रेंच प्रोफेसरचा धक्कादायक दावा

| Updated on: May 23, 2021 | 3:08 AM

सुप्रसिद्ध साथरोगतज्ज्ञ आणि प्राध्यापक ल्यूक मॉन्टेग्नियर यांच्या मते लसीमुळेच कोरोनाचे नवनवे व्हेरियंट्स तयार होतायत आणि त्याच व्हेरियंट्समुळे जगभरात मृत्यू वाढलेत.

कोरोनाची लसचं नव्या व्हेरियंट्सना कारणीभूत, नोबेल विजेत्या फ्रेंच प्रोफेसरचा धक्कादायक दावा
Nobel winner Scientist Luc Montagnier and vaccines
Follow us on

पॅरिस : सारं जग कोरोना लस घेतंय. दिग्गज नेते स्वतः कोरोना लस टोचून घेतायत. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. साथीच्या कोणत्याही रोगाला लसच अटकाव घालते, हा आजवरचा इतिहास आहे. मात्र, फ्रान्सच्या प्राध्यापकानं केलेला दावा नेमका याउलट आहे. सुप्रसिद्ध साथरोगतज्ज्ञ आणि प्राध्यापक ल्यूक मॉन्टेग्नियर (Nobel winner Luc Montagnier) यांच्या मते लसीमुळेच कोरोनाचे नवनवे व्हेरियंट्स तयार होतायत आणि त्याच व्हेरियंट्समुळे जगभरात मृत्यू वाढलेत. प्राध्यापक ल्यूक मॉन्टेग्नियर यांच्या दाव्यानं जगभरात खल सुरु झालाय (Nobel winner Scientist Luc Montagnier claim vaccines are responsible for new strains of Corona).

नोबेल पुरस्कारप्राप्त साथीरोग तज्ज्ञाचा गंभीर आरोप

प्राध्यापक मॉन्टेग्नियर हे स्वतः मोठे साथीच्या रोगाचे तज्ज्ञ आहेत. 2008 साली त्यांचा नोबेल पुरस्कारनंही सन्मान झालाय आणि हल्ली ते स्वतः लस घेतलेल्या लोकांचं परीक्षणही करतायत. प्राध्यापक मॉन्टेग्नियर यांच्या दाव्यानुसार जेव्हापासून जगात लसीकरण सुरु झालंय तेव्हापासूनच कोरोनाचे नवे व्हेरियंट्स जन्माला आलेत. विशेष म्हणजे लसीकरणानंतरच जगभर मृत्यूचं प्रमाणही वाढलंय, असाही दावा त्यांनी केलाय.

“लसीकरणानंतर जगभरात अनेक देशांमध्ये नवे कोरोना विषाणू सापडले”

नोव्हेंबरमध्ये ब्रिटननं आपत्कालीन तत्वावर लस वापरायला सुरुवात केली. त्यानंतर योगायोगानं काही दिवसातच ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला. नंतर 8 डिसेंबरला ब्रिटननं जगातलं पहिलं सार्वजनिक लसीकरण सुरु केलं. त्याच्या काही दिवसात जगातल्या 40 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव झाला. आता प्राध्यापक मॉन्टेग्नियर यांनी लसीकरण आणि मृत्यूचं प्रमाण यावर गंभीर आरोप केलेत.

प्राध्यापक मॉन्टेग्नियर यांचा लसीकरण आणि मृत्यूचं प्रमाण यावरील नेमका दावा काय?

साधारण जगभरात जानेवारीपासून सार्वत्रिक लसीकरणाला वेग आला. त्यानंतर दोन महिन्यात मृत्यू वाढण्याचं प्रमाणंही वाढलं. कोरोनाच्या जन्मापासून ते आतापर्यंत जगात जानेवारी 2021 मध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत. त्यानंतर मृत्यूची सर्वाधिक संख्या ही गेल्या एप्रिलमध्ये होती. आतापर्यंत जे साथीचे रोग आले, त्यावर लस शोधायला किमान 3 ते 4 वर्ष लागलीयत. मात्र, कोरोना हा एकमेव रोग असा आहे, की ज्यावरची लस ही फक्त दीडच वर्षात संशोधीत झाली. तसेच तिचा आपतकालीन वापरही सुरु झाला. आतापर्यंत संपूर्ण जग लसीकरण हीच कोरोनावर संजीवनी मानतंय, मात्र अधून-मधून समोर येणाऱ्या अशा दाव्यांमुळे लोकही बुचकळ्यात पडतायत.

हेही वाचा :

… तर कोव्हिशील्‍डच्या तिसऱ्या डोसने कोरोनाचा प्रत्येक विषाणू हरणार? वाचा नवा अभ्यास काय सांगतोय

कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात, ICMR प्रमुखांचा दावा

आपल्याकडे एक डोसची मारामार, युरोपियन कमिशनकडून 100 कोटीपेक्षा जास्त लशींची बुकींग

व्हिडीओ पाहा :

Nobel winner Scientist Luc Montagnier claim vaccines are responsible for new strains of Corona