
रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. उत्तर कोरियानं देखील या युद्धात उडी घेतली आहे. उत्तर कोरियाचं सैन्य सध्या रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये रशियाच्या बाजुनं लढत आहे. मात्र या युद्धामध्ये उत्तर कोरियाच्या सैन्याची देखील प्रचंड हानी झाली आहे. अनेक सैन्याचा मृत्यू झाला आहे. आपल्या सैन्याच्या शवपेट्या पाहून आता उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन प्रचंड संतप्त झाले आहेत, त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे अनेक देशांमध्ये दहशत निर्माण झाल्याचं पाहयला मिळत आहे.
उत्तर कोरियानं युक्रेनविरोधात लढण्यासाठी रशियात आणखी 30 हजार सैन्य पाठवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीच युक्रेनविरोधात युद्ध लढण्यासाठी किम जोंग ऊन यांनी आपलं हजारो सैन्य पाठवलं आहे. उत्तर कोरियानं केलेल्या दाव्यानुसार या सैन्याची संख्या 11 हजार एवढी आहे. तर युक्रेननं केलेल्या दाव्यानुसार उत्तर कोरियानं रशियाच्या मदतीला 14 हजार सैन्य पाठवं आहे. तर तीन हजार अतिरिक्त सैन्य पाठवल्याचा दावा देखील युक्रेनकडून करण्यात आला आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार आपल्या सैन्याच्या मृत्यूनंतर उत्तर कोरियानं आता आणखी 30 हजार सैन्य या युद्धात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाची ताकद वाढणार
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार उत्तर कोरियाचं सैन्य लवकरच रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनमध्ये जाऊन पुतीन यांच्या सैन्याला बळ पुरवणार आहे. एवढंच नाही तर रशियाला या युद्धासाठी आवश्यक असणारी शस्त्र आस्त्र आणि दारूगोळा देखील पुरवला जाणार आहे. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्यानं द सनमध्ये छापण्यात आलेल्या एका वृत्तानुसार उत्तर कोरियातून सैन्य आणण्यासाठी रशियन विमानं सज्ज झाली आहेत. तर दुसरीकडे दक्षिण कोरियाच्या संसदेकडून असा देखील दावा करण्यात आला आहे की, रशियामध्ये सैन्य पाठवण्यासाठी उत्तर कोरियानं नव्यानं सैन्य भरती सुरू केली आहे.
रशिया, उत्तर कोरियाच्या मैत्रीमुळे वाढलं टेन्शन
रशिया आणि उत्तर कोरियामध्ये चांगली मैत्री आहे. त्यामुळे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसारख्या देशांचं आता टेन्शन वाढलं आहे. अमेरिकेला या गोष्टीची चिंता आहे की, रशिया आणि उत्तर कोरियामध्ये मैत्री आहे. त्यामुळे रशिया कोरियाला संवेदनशील तंत्रज्ञान देखील पुरवू शकतो. त्यामुळे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला गती येऊ शकते.